
पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) राम मंदिर (Ram Mandir) बांधण्यासाठी भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी रामनवमीनिमित्त मंदिराची पायाभरणी केली. हे मंदिर नंदीग्रामच्या सोनाचुडा येथे बांधले जाईल. त्याचे मॉडेल अयोध्येच्या राममंदिरासारखे असणार आहे. या पायाभरणी समारंभाचे छायाचित्र सुवेंदू अधिकारी (Suvendu Adhikari) यांनी स्वतः त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. व्हिडिओमध्ये शेकडो लोक भगवे कपडे घालून आणि सनातनचा हिंदू (Hindu) धर्मांचा ध्वज घेऊन कार्यक्रमाला उपस्थित असल्याचे दिसत आहे. तिथे सुवेंदू अधिकारी (Suvendu Adhikari) सर्व भाविकांचे स्वागत करताना आणि मंदिराची पायाभरणी करताना दिसतात.
( हेही वाचा : ‘श्रीलंकेची भूमी भारताविरुद्ध वापरली जाणार नाही’; पंतप्रधान Narendra Modi सोबतच्या बैठकीत राष्ट्रपती दिसानायके यांचे आश्वासन)
त्यांच्या इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करताना त्यांनी लिहिले की, “भारतीय सनातन संस्कृती आणि धार्मिक परंपरेनुसार, अयोध्येतील ऐतिहासिक पवित्र रामजन्मभूमी मंदिराच्या धर्तीवर मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री रामचंद्रांना समर्पित भव्य मंदिराचे भूमिपूजन आणि पायाभरणीचा शुभ समारंभ आज रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर पार पडला.”
त्यांनी सांगितले की, पायाभरणी समारंभ नंदीग्रामचे पहिले ‘हिंदू हुतात्मा’ स्वर्गीय देवव्रत मैती यांच्या पत्नी कल्पना मैती यांनी केला. ते पुढे म्हणाले, “भगवान राम यांच्या धर्म, धैर्य आणि करुणेच्या मूल्यांना हृदयात जपणाऱ्या सर्वांसाठी हा एक ऐतिहासिक आणि आनंदाचा प्रसंग आहे. या मंदिराचे बांधकाम केवळ विटा आणि दगडांचे नसून, ते श्रद्धा, एकता आणि सांस्कृतिक अभिमानाचा वारसा जोपासण्यासाठीचे बांधकाम आहे.”
१.५ एकरवर मंदिर उभे राहणार!
अयोध्येच्या राम मंदिराच्या (Ram Mandir) धर्तीवर बंगालमध्ये (West Bengal) बांधले जाणारे हे मंदिर (Ram Mandir) सुमारे ३.५ बिघा (सुमारे १.५ एकर) जमिनीवर बांधले जाईल. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे मुख्य पूजास्थळाव्यतिरिक्त, येथे एक गोठा, गोशाळा, आयुष आरोग्य केंद्र आणि पर्यटकांसाठी एक अतिथीगृह देखील असेल.
तसेच या मंदिराच्या बांधकामाच्या बातमीवर तृणमूल काँग्रेसने (Trinamool Congress) तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. पक्षाने आरोप केला आहे की सुवेंदू अधिकारी (Suvendu Adhikari) यांनी हुतात्मा सैनिकाच्या कुटुंबांच्या स्मरणार्थ रुग्णालय बांधण्यासाठी पूर्वी खरेदी केलेल्या जमिनीचा वापर मंदिरासाठी आहे. टीएमसी नेते कुणाल घोष म्हणाले की, हे धार्मिक राजकारणाचे उदाहरण आहे आणि अधिकारी यांनी या मुद्द्यावर जनतेला उत्तर दिले पाहिजे.
तृणमूल काँग्रेसचे धाबे दणाणले!
दरम्यान नंदीग्राममध्ये भाजपा (BJP) नेत्याने राममंदिराची पायाभरणी केल्याने तृणमूलचे धाबे दणाणले आहेत. कारण नंदीग्राम हा पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचा राजकीय बालेकिल्ला आहे. २००७ मध्ये येथे भूसंपादनाविरुद्ध मोठे आंदोलन झाले, ज्यामुळे ममता राजकीयदृष्ट्या प्रसिद्ध झाल्या. आता, सुवेंदू अधिकारी यांनी या ठिकाणी राम मंदिर बांधण्याची घोषणा केली आहे. सुवेंदू अधिकारी हे या ठिकाणचे भाजपा आमदार आहेत. (West Bengal)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community