देशात ‘या’ शहराला सलग पाचव्यांदा मिळाला, ‘स्वच्छ शहराचा’ मान!

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२१’ पुरस्कार जाहीर केले. यात, इंदूरला पुन्हा एकदा भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून पुरस्कार मिळाला आहे. या स्पर्धेच्या सहाव्या आवृत्तीत मध्य प्रदेशातील इंदूर या शहराने सलग पाचव्यांदा हा पुरस्कार जिंकला आहे. गेल्या वर्षी स्वच्छ शहरांच्या यादीत दुसरे स्थान पटकावणाऱ्या गुजरातमधील सुरतने यंदाही आपले स्थान कायम राखले आहे. तर, आंध्र प्रदेशातील विजयवाडा या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

स्वच्छ सर्वेक्षण २०२१

या वर्षीच्या वार्षिक स्वच्छता सर्वेक्षणात तब्बल ३४२ शहरांना काही स्टार रेटिंग देण्यात आले होते. त्यात एकूण ४ हजार ३२० शहरांचा सहभाग आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय (MOHUA) यांनी स्वच्छ भारत मिशन-अर्बन (SBM-U) अंतर्गत क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया (QCI) सोबत ‘स्वच्छ सर्वेक्षण 2021’ पुरस्कारांचे आयोजन केले होते, हा “जगातील सर्वात मोठा शहरी स्वच्छता सर्वेक्षण” करणारा कार्यक्रम आहे.

( हेही वाचा : दहावी-बारावीची परीक्षा ऑफलाईन, शिक्षण मंडळाचे वेळापत्रक तयार! )

तीन पॅरामीटर्सचा विचार

सेवा पातळी प्रगती (SLP), इतर प्रमाणपत्रे आणि नागरिकांचा आवाज या तीन घटकांवर शहरांची क्रमवारी लावली जाते. एसएलपी मध्ये, शहरी स्थानिक संस्थेद्वारे डेटा प्रदान केला जातो, तर प्रमाणपत्रांमध्ये, कचरामुक्त शहरे, रेटिंग, उघड्यावर शौचास बंदी अशी शहरे आणि पाणी रेटिंग विचारात घेतले जातात. नागरिकांच्या आवाजासाठी, “प्रतिक्रिया, अनुभव, प्रतिबद्धता, स्वच्छता अॅप आणि नावीन्य” विचारात घेतले जातात. या तीन पॅरामीटर्समधून गुण जोडल्यानंतर शहर किंवा शहराचा अंतिम स्कोअर ठरवला जातो.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here