Swami Avimukteshwarananda : गाईला जनावरांच्या सूचीतून वगळा, शंकराचार्य अविमुक्‍तेश्‍वरानंद सरस्‍वती यांची मागणी

196
Swami Avimukteshwarananda : गाईला 'जनावरां'च्या सूचीतून वगळा, शंकराचार्य अविमुक्‍तेश्‍वरानंद सरस्‍वती यांची मागणी
Swami Avimukteshwarananda : गाईला 'जनावरां'च्या सूचीतून वगळा, शंकराचार्य अविमुक्‍तेश्‍वरानंद सरस्‍वती यांची मागणी

केंद्र सरकारच्‍या सूचीमध्‍ये गाईला प्राण्यांच्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे. परंतु भारतीय संस्कृतीत गाईला ‘माता’ संबोधले आहे. त्यामुळे गाईला प्राणी म्हणणे हा सनातन धर्माचा आणि सनातन धर्माच्या अनुयायांचा अपमान आहे. त्यामुळे केंद्र सरकारने प्रसारित केलेल्‍या जनावरांच्‍या सूचीतून गाईला वगळावे, अशी मागणी उत्तराखंडमधील (Uttarakhand) बद्रीनाथ येथील ज्‍योतिष पीठाचे शंकराचार्य स्‍वामी अविमुक्‍तेश्‍वरानंद सरस्‍वती (Swami Avimukteshwarananda Saraswati Maharaj) यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. शंकराचार्यांनी ‘गो प्रतिष्‍ठा ध्‍वज प्रतिष्‍ठापना यात्रे’चे आयोजन केले आहे. ही यात्रा नुकतीच ओडिशात पोचली आहे. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

( हेही वाचा : Irani Cup 2024 : इराणी चषक विजेत्या मुंबई संघाचा होणार जाहीर सत्कार

दरम्यान शंकराचार्यांनी गाईला संरक्षण मिळवून देणे आणि गाईची सेवा करणे, हा या यात्रेचा उद्देश असल्याचे सांगितले. तसेच गोमातेचे सरंक्षण आणि संवर्धन यांसाठी सरकारने कायदा करावा, अशी मागणी ही त्यांनी केली. तसेच . केंद्र सरकार कायदा करत नाही तोपर्यंत गोमातेच्या संरक्षणासाठी हे कार्य करत राहणार असल्याचे ही शंकराचार्य स्‍वामी  अविमुक्‍तेश्‍वरानंद सरस्‍वती (Swami Avimukteshwarananda Saraswati Maharaj) म्हणाले.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.