जगात ख्रिश्चन व मुस्लीम राष्ट्रे आहेत. मात्र एकही हिंदू राष्ट्र (Hindu Rashtra) नाही. भारतात हिंदू (Hindu) बहुसंख्य आहेत, त्यामुळे भारताला हिंदू राष्ट्र (Hindu Rashtra) घोषित करा. देशात समान नागरि कायदा लागू करा, अशी मागणी अखिल भारतीय संत समितीचे महामंत्री स्वामी भारतानंद सरस्वती महाराज (Swami Bharatananda Saraswati ) यांनी केली. मालेगाव (Malegaon) येथील यशश्री कंपाउंडमध्ये दि. ३० मार्च रोजी झालेल्या विराट हिंदू संत संमेलनात ते बोलत होते. (Hindu Rashtra)
( हेही वाचा : Income Tax : नवीन करप्रणाली १ एप्रिलपासून लागू होणार)
वारकरी संप्रदायातील संग्रामबापू भंडारे (Sangrambapu Bhandare), मिलिंद एकबोटे (Milind Ekbote), राष्ट्रसंत मुनी नीलेशचंद्र महाराज आदी उपस्थित होते. स्वामी भारतानंद (Swami Bharatananda Saraswati ) म्हणाले की, लव्ह जिहाद (Love Jihad) व लँड जिहाद विरोधात कठोर कायदे करण्याची गरज आहे. औरंगजेबासारख्या क्रूरकर्म्यांचे उद्दात्तीकरण करणे हा इतिहासावर कलंकाचा प्रयत्न असून त्याची कबर काढून समुद्रात फेकून द्या. दरम्यान प्रकृती अस्वस्थतेमुळे साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर मालेगावात येऊ शकल्या नाहीत. त्यांनी उपस्थितांशी भ्रमणध्वनीद्वारे संवाद साधला. ‘तब्येत ठीक नसल्याने येऊ शकले नाही. माझे विचार तुमच्या सोबत आहेत,’ असे त्या म्हणाल्या. (Swami Bharatananda Saraswati)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community