हिंदू आध्यात्मिक एवं सेवा संस्थानच्या (Hindu Spiritual and Service Mela) वतीने ९ ते १२ जानेवारी या कालावधीत भव्य हिंदू आध्यात्मिक एवं सेवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ९ जानेवारीला स्वामी गोविंद देव गिरी महाराज (Swami Govind Dev Giri Maharaj) , देवेंद्र ब्रह्मचारी, मैत्रेय दादाश्रीजी यांच्या उपस्थितीत या मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे. मूल्यवर्धन म्हणजेच राष्ट्रनिर्माण हे या कार्यक्रमाचे बोधवाक्य आहे. महाराणी अहिल्याबाई होळकर मैदान, लक्ष्मी पार्क, बांगुर नगर, महाराजा अग्रसेन मार्ग, गोरेगाव (प), मुंबई ४००१०४ येथे हा मेळावा भरणार आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही (Eknath Shinde) उपस्थित राहणार आहेत.
हेही वाचा-Tirupati stampede : तिरूपती मंदिरात चेंगराचेंगरी; सहा भाविकांचा मृत्यू, अनेकजण गंभीर
इतर कार्यक्रम दुपारी २.१५ ते ४.१५ या वेळेत होतील. त्यात चित्रकला व संगीत स्पर्धांचे आयोजन करण्यात येईल. या कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोष गोएंका असून मुख्य अतिथी सुरेश पूनमिया व सन्मानीय अतिथी श्रीधर गुप्ता, पवन सिंघल, राजेंद्र डालमिया, विनोद गोयल हे असणार आहेत. सायंकाळी ५.३० वाजता श्री गणपती अथर्वशीर्ष व सायंकाळी ६.३० ला गंगा आरती (Ganga Aarti) होईल. (Swami Govind Dev Giri Maharaj)
हेही वाचा-Fastest Ball in Cricket History : रावळपिंडी एक्स्प्रेसचा हा विक्रम आहे आजही अबाधित
सकाळी ९.३० वाजता या मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे. त्यावेळी अध्यक्षस्थानी प्रसिद्ध उद्योगपती संजय डांगी असतील. विशेष अतिथी पृथ्वीराज कोठारी तर सन्मानीय अतिथी जायन्ट्स वेल्फेअर फाऊंडेशनच्या शायना एनसी असतील, अशी माहिती या मेळाव्याचे सचिव अमरनाथ शर्मा यांनी दिली. (Swami Govind Dev Giri Maharaj)
हेही वाचा-रुग्ण केंद्रीत आरोग्य व्यवस्था निर्माण करा; CM Devendra Fadnavis यांचे निर्देश
मूल्य निर्माण से ही राष्ट्रनिर्माण कार्यक्रमाची प्रस्तुती प्रसिद्ध कवी मनोज मुंतशीर शुक्ला करणार आहेत. हा कार्यक्रम सायंकाळी ७.३० वाजता सुरू होईल. या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी मेला संरक्षक शारदा रामप्रकाश बुबना असतील. तर अध्यक्ष दीनबंधू जालान तर सन्मानिय अतिथी अनिल अग्रवाल, कमल सोमाणी, ओमप्रकाश चमडिया असतील. (Swami Govind Dev Giri Maharaj)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community