जगातील सर्वात उंच माऊंट एव्हरेस्ट सर केल्यानंतर पुणे पोलीस दलातील कर्मचारी गिर्यारोहक स्वप्नील गरड (Swapnil Garad) यांचं निधन झालं आहे. काही दिवसांपूर्वीच स्वप्नील गरड यांनी माउंट एव्हरेस्टवर यशस्वीपणे चढाई केली होती. भल्या मोठ्या एव्हरेस्टवर स्वप्नील गरड यांनी तिरंगा फडकविला होता. त्यांच्या या कामगिरीमुळे महाराष्ट्र पोलीस दलाची मान उंचावली. मात्र हा आनंद त्यांना जास्त वेळ टिकवता आला नाही.
(हेही वाचा – Biporjoy Cyclone : येत्या 36 तासात चक्रीवादळ अधिक तीव्र होणार ; ‘या’ चार राज्यांना सतर्कतेचा इशारा)
एव्हरेस्ट सर केल्यानंतर त्यांची (Swapnil Garad) प्रकृती बिघडली होती. त्यांना माऊंट एव्हरेस्टवर ब्रेन डेड हा आजार झाला होता. त्यानंतर त्यांना काठमांडूतील हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं होतं. मात्र, बुधवारी (७ जून) दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
पुणे पोलीस दलातील आर्थिक गुन्हे शाखेत स्वप्नील गरड (Swapnil Garad) कार्यरत होते. पुण्यातील केशवनगर भागात ते वास्तव्यास होते. स्वप्नील गरड यांनी एकूण ६ हिमशिखरे पादाक्रांत केली होती. या शिखरांपैकी माऊंट युनम, माऊंट हनुमान तिब्बा, माऊंट लाखोकांन्तसे आणि माऊंट अमा दबलम या शिखरांचा समावेश होता. एवढी मोठी कामगिरी सर करणारे महाराष्ट्र पोलीस दलातील ते पहिलेच पोलिस कर्मचारी होते.
त्यांच्या (Swapnil Garad) निधनामुळे पुणे पोलिस दलावर शोककळा पसरली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community