स्वारगेट ते मंत्रालय Shivneri Bus मंगळवारपासून अटल सेतूमार्गे धावणार, काय आहेत नियम? जाणून घ्या…

मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतूमुळे प्रवासाचे अंतर बऱ्यापैकी कमी झाले असून, आता या मार्गावरून एसटी महामंडळाच्या बस धावू लागल्या आहेत.

2631
स्वारगेट ते मंत्रालय Shivneri Bus मंगळवारपासून अटल सेतूमार्गे धावणार, काय आहेत नियम? जाणून घ्या...

मंत्रालयातील कामांव्यतीरिक्त इतर कामांसाठी मुंबई ते पुणे असा प्रवास करणाऱ्यांसाठी एसटी महामंडळाने स्वारगेट – मंत्रालय – स्वारगेट अशी शिवनेरी बस सेवा मंगळवारपासून सुरू केली आहे. दर सोमवारी आणि शुक्रवारी ही बस सेवा धावणार असून, या शिवनेरीचा प्रवास (Shivneri Bus) अटल सेतू (Atal setu) मार्गे होणार आहे.

मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतूमुळे प्रवासाचे अंतर बऱ्यापैकी कमी झाले असून, आता या मार्गावरून एसटी महामंडळाच्या बस धावू लागल्या आहेत. पुणे ते दादर असा अटल सेतूवरून प्रवास करणाऱ्या बसला चांगला प्रतिसाद मिळत असतानाच मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनी मंत्रालय-स्वारगेट बसची मागणी केली होती. पुणे गाठण्यासाठी रेल्वे असली तरी तुलनेने ही सेवा अपुरी पडत असल्याने मंत्रालयीन कर्मचा-यांनी मंत्रालय-स्वागरगेट सेवेची मागणी केली होती. त्यानुसार, ही सेवा सुरू करण्यात आली आहे.

(हेही वाचा – CRPF Bus Fire: शहा यांच्या उच्चस्तरीय बैठकीच्या दिवशी सीआरपीएफची बस पेटवली )

‘या’ परिसरात काम करणाऱ्यांसाठी…
सोमवारी मंत्रालयातील अनेक अधिकारी, कर्मचारी नोकरीसाठी तसेच सर्व सामान्य नागरिक आपल्या कामासाठी मंत्रालयात येत असतात. त्यांना थेट मंत्रालयात सोडणारी कोणतीही दळणवळण सेवा आतापर्यंत उपलब्ध नव्हती. एसटीने सुरू केलेल्या या सेवेमुळे मंत्रालय, विधिमंडळ, उच्च न्यायालयात व छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकाच्या परिसरात काम करणाऱ्या लोकांना याचा फायदा होणार आहे.

सोमवारी / स्वारगेट – मंत्रालय / सकाळी ६ वाजता
शुक्रवारी / मंत्रालय – स्वारगेट / सायंकाळी ६.३० वाजता

महिलांना आणि ६५ ते ७५ वर्षांपर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरात ५० टक्के सवलत आहे. ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के सवलत आहे.

तिकीट किती आहे ?
फुल – ५६५
हाफ – २९५

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.