स्वारगेट मेट्रो स्थानकाचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे स्वारगेट-शिवाजीनगर मेट्रो प्रवास लवकरच शक्य होईल असा विश्वास मेट्रो अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
मेट्रो प्रशासनाकडून मेट्रोचा दुसरा टप्पा खुला करण्यात आला आहे. पुढच्या दोन्ही टप्प्यांची कामे युद्धपातळीवर करण्यात येत आहेत. लवकरच रुबी हॉल स्थानक ते रामवाडी हा मेट्रोचा टप्पा प्रवाशांसाठी सुरू करण्यात येणार आहे. सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या मार्गावरील तीन भुयारी स्थानकांची कामे अजून बाकी आहेत. ही कामे पूर्ण करण्यासाठी मेट्रोकडून तिन्ही स्थानकांची कामे एकाच वेळी सुरू आहेत.
(हेही वाचा – Ganeshotsav 2023 : गणेशोत्सवातील विशेष 6 गाड्यांमध्ये एकूण 16 डबे वाढवणार )
मेट्रो स्वारगेट मेट्रो स्थानकाचे वरील दोन मजले बांधून देणार आहे. पीएमपीच्या 20 जण बसू शकतील एवढ्या क्षमतेचे स्थानक आम्ही बांधणार आहोत. एसटीची जागा अद्याप आम्हाला मिळाली नाही, अशी माहिती मेट्रो अधिकाऱ्यांनी दिली आहे.
भूमिगत स्थानकाची सद्यस्थिती
स्वारगेट स्थानकाचे भूमिगत काम सध्या 85 टक्के पूर्ण झाले असून, आता एलिव्हेटेड इमारत बांधकाम सुरू आहे. चार ते पाच मजल्यांचे एलिव्हेटेड काम पूर्ण होत असून, आगामी काळात लवकरच ते पुणेकरांसाठी खुले होईल.
हेही पहा –