Swatantra Veer Savarkar Movie : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयघोषाने माहिमचे सिटीलाईट सिनेमागृह दुमदुमले

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकांच्या वतीने चित्रपटाचं आयोजन

320
Swatantra Veer Savarkar Movie : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयघोषाने माहिमचे सिटीलाईट सिनेमागृह दुमदुमले
Swatantra Veer Savarkar Movie : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयघोषाने माहिमचे सिटीलाईट सिनेमागृह दुमदुमले

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाचे योगदान देणारे थोर क्रांतीकारक विनायक दामोदर सावरकर (Vinayak Damodar Savarkar) यांच्या आयुष्याची गाथा मांडणारा रणदीप हुड्डा (Randeep Hooda) यांचा ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या सिनेमाचे प्रदर्शन माहिममधील सिटी लाईट सिनेगृहात करण्यात आले. या वेळी चित्रपटाला राष्ट्रप्रेमी प्रेक्षकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या वेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय कार्याध्यक्ष रणजीत सावरकर, तसेच कोषाध्यक्ष मंजिरी मराठे उपस्थित होत्या. (Swatantra Veer Savarkar Movie)

(हेही वाचा – Devendra Fadnavis : राहुल गांधी, ठाकरेंकडून महिला शक्तीचा वारंवार अवमान

इतिहास तरुण पिढीपर्यंत पोहोचेल

माहिम येथील सिटी लाईट सिनेमा (City Light Cinema) गृहात बुधवारी संध्याकाळी ६ वाजून ४५ मिनिटांच्या प्रयोगाच्या वेळी चित्रपटगृहात रणजीत सावरकर (Ranjeet Savarkar) यांनी प्रेक्षकांना संबोधित केले. रणजीत सावरकर म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर हा सिनेमा येणाऱ्या पिढीने सुद्धा पाहिला पाहिजे. त्यामुळे हा इतिहास तरुण पिढीपर्यंत पोहोचेल. (Swatantra Veer Savarkar Movie)

(हेही वाचा – Unmesh Patil : उद्धव ठाकरे यांनी स्वतःची कबर स्वतः खोदली; महाजनांची उन्मेष पाटील यांच्यावर टीका.)

बाजू मांडण्याचा प्रयत्न

अतिशय विस्तृत असा कालखंड तीन तासांच्या चित्रपटात बांधण्यासाठी दिग्दर्शक रणदीप हुड्डा यांनी प्रचंड परिश्रम घेतले आहेत. तरीही ‘सावरकर एक व्यक्ती’ आणि ‘एक विचार’ अशा दोन्ही बाजूंनी स्वातंत्र्यवीरांचा सत्य इतिहास कथन करण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे, असे मनोगत प्रेक्षकांनी व्यक्त केले. (Swatantra Veer Savarkar Movie)

(हेही वाचा – Kangana Ranaut : ‘त्या’ दोघांना त्यांचे जीवन जगण्याची मुभा द्यायला हवी होती; कंगना रणौतची गांधी कुटुंबावर टीका

या वेळी भागोजी शेठ कीर समितीचे नवीन बांदिवडेकर, प्रकाश कांबळी, वैभव तारी, रवी मेणकूरकर, शिवराज्याभिषेक दीनोत्सव समितीचे सुनील पवार, दादर सांस्कृतिक मंचाच्या उत्तरा मोने, स्लिमवेलच्या योगिनी पाटील, राजन जोथाडी, श्रीपाद काळे, स्वप्निल परब, अविनाश धर्माधिकारी, रुपाली देसाई, विनायक काळे, बिपीन शिवथरकर, शिवाजी पार्क आणि माहीम पोलीस स्थानक अशा अनेकांचे सहकार्य लाभले. (Swatantra Veer Savarkar Movie)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.