Swatantra Veer Savarkar Movie : ‘गुढी उभारू राष्ट्रप्रेमाची, सावरकरांच्या सन्मानाची…’

222

‘हिंदुत्वाचं प्रतीक’ म्हणजे सावरकर आणि म्हणूनच स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीनं सर्व राष्ट्रप्रेमी संस्थांना विनंती करण्यात आली आहे की, मंगळवार दि. ९ एप्रिलला गुढीपाडव्याच्या दिवशी सर्व संस्थांनी पुन्हा एकदा ठिकठिकाणी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantra Veer Savarkar Movie) चित्रपटाचं आयोजन करावं. सर्व राष्ट्रप्रेमी मंडळींना विनंती आहे की, गुढीपाडव्याला आपण आवर्जून ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट बघावा. आधी बघितला असेल, तरी बघावा. हिंदी बघितला असेल, तर मराठी पहावा. शेजारी-पाजारी, सगेसोयरे यांनाही चित्रपट पहाण्यासाठी प्रोत्साहित करावं.

रणदीप हुड्डा यांनी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट बनवून ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांची गुढी’ उभारली आहे. अनेक राष्ट्रप्रेमी संस्था, व्यक्ती ठिकठिकाणी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाचे खेळ आयोजित करत आहेत. लोकही अतिशय उत्साहानं चित्रपट बघायला जात आहेत.

(हेही वाचा Swatantra Veer Savarkar : दिल्लीकरांसाठी ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाच्या खास शोचं आयोजन, अभिनेते रणदीप हुड्डा यांची विशेष उपस्थिती)

आपला अनेक वर्षांचा दडवून ठेवलेला इतिहास या चित्रपटामुळे समोर येत आहे. हिंदू म्हणजे कोण? तसंच वीर सावरकरांची हिंदुत्वाची संकल्पना या चित्रपटामुळे अगदी स्पष्ट होते आहे. सध्याची आपल्या देशातली परिस्थिती पाहता आपण सर्वांनी जात, पात, पंथ बाजूला ठेऊन एक हिंदू म्हणून ठाम उभं राहण्याची, एकत्र येण्याची गरज आहे. आपल्याच देशात आपलंच अस्तित्व नष्ट होण्याची परिस्थिती येऊ घातली आहे. यासाठी हिंदूंनी संघटित होणं अत्यावश्यक आहे. आपला आवाज, आपलं सामर्थ्य दाखवण्याची गरज आहे.

हिंदूंनी संघटित होणं ही काळाची गरज आहे. ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ (Swatantra Veer Savarkar Movie) चित्रपटाच्या निमित्तानं एकत्र येऊया आणि राष्ट्रप्रेमाची गुढी उभारूया. सावरकरांसाठी नाही, रणदीप हुड्डा यांच्यासाठी नाही, तर आपल्याच उज्ज्वल भविष्यासाठी. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संकल्पनेतील भगवा ध्वज उभारून सर्वत्र भगव्या रंगाची उधळण करूया. आपण या उपक्रमात सहभागी व्हाल, याची खात्री आहेच.

कोथरूडमध्ये ८-९ एप्रिल रोजी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाचे आयोजन

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबईच्या वतीने सोमवार, दि. ८ एप्रिल २०२४, सायंकाळी ५.३० वाजता सिटी प्राइड, कोथरूड येथे कर्वे शिक्षण संस्थेच्या मुलींसाठी, तर मंगळवार, ९ एप्रिल २०२४, मंगला चित्रपटगृहात दुपारी २ वाजता पुणे मराठी ग्रंथालयातील मुलांसाठी ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ (Swatantra Veer Savarkar Movie)  चित्रपटाचे आयोजन करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.