अंदमानच्या (Andaman) सेल्युलर जेलबाहेरील (Cellular Jail) स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या (Swatantraveer Savarkar) पुतळ्याची दुरवस्था झाल्याचा व्हिडिओ लेखक, व्याख्याते पार्थ बावस्कर यांनी सोशल मीडियावर दि. ९ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केला. ‘अंदमान बोलवतोय’ मोहिमेअंतर्गत पार्थ बावस्कर आणि सावरकरप्रेमी अंदमानातील सेल्युलर जेलला भेट देत असतात. त्यावेळी पार्थ बावस्कर यांच्या निदर्शनास ही गोष्ट आली. त्यामुळे अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) आणि पार्थ बावस्कर (Parth Bawaskar) यांनी या स्थितीबद्दल चिंता व्यक्त करत प्रशासनाच्या दुर्लक्षावर टीका केली आहे.
(हेही वाचा : Shirish maharaj more यांच्या कुटुंबीयांना एकनाथ शिंदे यांच्याकडून मदतीचा हात)
स्वातंत्र्यवीर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाचे क्रांतिकारक होते. अंदमान-निकोबारमधील (Andaman and Nicobar) सेल्युलर जेलमध्ये (Cellular Jail) त्यांना कठोर कारावासाची शिक्षा भोगावी लागली होती. त्यांच्या स्मृतींना आदरांजली म्हणून या ठिकाणी त्यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. मात्र, सध्या या पुतळ्याची अवस्था अत्यंत खराब झाली असून, त्याची देखभाल आणि दुरुस्तीची आवश्यकता आहे.
दरम्यान याप्रकरणी जनजागृती करत प्रशासनाला दखल घेण्यास सांगणारा व्हिडिओ पार्थ बावस्कर आणि सावरकरप्रेमींनी तयार करून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध केला. यामध्ये पार्थ बावस्कर (Parth Bawaskar) यांनी पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहले की, सेल्युलर जेलबाहेरील सावरकरांच्या पुतळ्याचा चष्मा तुटला आहे, शिवाय तिथे स्वच्छता अजिबात ठेवली जात नाही. पुतळ्यावर किती घाण साचली आहे, हे व्हिडिओत बघा. आपण आपल्याकडून स्वच्छता करू, निगा राखू पण प्रशासनाने आता यासाठी काहीतरी करायला हवे, अशी अपेक्षा बावस्कर यांनी पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केली.
यासंदर्भात पार्थ बावस्कर यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’ला प्रतिक्रिया देताना सांगितले की, गेल्या अनेक महिन्यांपासून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या (Swatantraveer Savarkar) पुतळ्याची परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. तीन महिन्यांपूर्वी आम्ही आमच्यापरीने सावरकारांच्या पुतळ्यावरील चष्म्याला तात्पुरती डागडुजी केली. दर महिन्याला आम्ही दोनदा अंदमानात सावरकरप्रेमींना घेऊन जात असतो. परंतु अनेक दिवसांपासून पुतळ्याची दुरवस्था झाल्याचे आम्हाला पाहायला मिळत आहे. दि. ७ फेब्रुवारी रोजी अंदमानात शुट केलेला तो व्हिडिओ असून प्रशासनाने अद्याप याबाबत कोणतेही पाऊल उचलेले नाही. मात्र प्रशासनाने लवकरात लवकर घटनेची दखल घ्यावी. अशी सावरकरप्रेमींची मागणी आहे, असेही बावस्कर म्हणाले.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community