स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट (Swatantrya Veer Savarkar Film) प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकवर्गाची पसंती दिवसागणिक वाढत आहे. इस्त्रायलचे राजदूत कोब्बी शोशानी यांनीही या चित्रपटाचे स्वतः कौतुक केले आहे.
(हेही वाचा – Holi Festival 2024 : सांस्कृतिक वैविध्याची शोभा वाढवणारी होळी!)
इस्त्रायलचे राजदूत कोब्बी शोशानी यांनी केले कौतुक :
कोब्बी शोशानी यांनी म्हटले की, ‘हा चित्रपट पाहणे भारताचा इतिहास नव्याने शोधण्याचा आणखी एक मार्ग आहे. भारत आणि इस्त्रायल या दोन्ही देशांतील अनेक गोष्टी सम्यक आहेत. सर्वांनी रणदीप हुड्डा यांचा ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ (Swatantrya Veer Savarkar Film) हा चित्रपट जरूर पहावा, असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. यावर नेटकऱ्यांनी त्यांच्या पोस्टचे मनापासून स्वागत केल्याचे दिसत आहे.
Watching films is another way of discovering India’s history.
🇮🇳and 🇮🇱 have so many things in common. It’s amazing
Go to see #Savarkar by Randeep Hooda pic.twitter.com/IAlDlpZzSj
— Kobbi Shoshani 🇮🇱 (@KobbiShoshani) March 23, 2024
(हेही वाचा – Holi 2024 : भगवा रंग उधळुया चला…)
बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौर सुरु :
तर दुसरीकडे या चित्रपटाची (Swatantrya Veer Savarkar Film) बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौर सुरु आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, या सिनेमाने पहिल्या दिवशी १. ०५ कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी या सिनेमाने २.२५ कोटींचा गल्ला जमवला. विशेष म्हणजे या सिनेमाच्या कमाईच्या आकडेवारीत दिवसेंदिवस वाढ होत असून तीन दिवसात या सिनेमाने बरीच कमाई केली आहे.
तिसऱ्या दिवशी ३.३० कोटींची कमाई :
स्वातंत्र्यवीर सावरकर या सिनेमाने (Swatantrya Veer Savarkar Film) रिलीजच्या तिसऱ्या दिवशी ३.३० कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे हा सिनेमा टप्प्याटप्याने बॉक्स ऑफिसवर गल्ला जमवतांना दिसत आहे.
हिंदी आणि मराठी या दोन भाषांमध्ये चित्रपट रिलीज :
दरम्यान, स्वातंत्र्यवीर सावरकर हा सिनेमा (Swatantrya Veer Savarkar Film) हिंदी आणि मराठी या दोन भाषांमध्ये रिलीज झाला आहे. या सिनेमात रणदीपसोबत अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटात तीने सावरकरांची पत्नी यमुनाबाई सावरकर यांची भूमिका वठवली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community