केवळ सावरकरांचे पुतळे उभारून चालणार नाही, त्यांचे विचार पोहोचणे गरजेचे – रणजित सावरकर

163

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्मदिन ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मंगळवारी, ११ एप्रिल २०२३ या दिवशी केली. त्याचे स्वागत स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी केले आहे. मात्र त्याचबरोबर त्यांनी सांगितले की, सावरकरांचे केवळ पुतळे उभारून चालणार नाही, तर त्यांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या विविध अवमानास्पद टीकांचा, वक्तव्यांचा भाग पाहाता सावरकरांचा असा गौरव होणे यथोचितच आहे, तसे व्हायला हवेच होते. मात्र त्याचबरोबर सावरकरांचे विचारही लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.
पदव्युत्तर अभ्यासक्रमात पूर्वी सावरकरांचे साहित्य अभ्यासासाठी होते. मात्र आज ते नाही. त्यामुळे सावरकरांचे विचार लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, लोकांना त्याबद्दल अधिक कळावे म्हणून त्यांचे साहित्य अभ्यासक्रमात आणले गेले पाहिजे, अशी मागणीही रणजित सावरकर यांनी यानिमित्ताने व्यक्त केली.

(हेही वाचा वीर सावरकरांचा २८ मे हा जन्मदिवस ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा करणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा)

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बी. ए. ची पदवी मुंबई विद्यापीठाने काढून घेतली होती. अशा प्रकारे पदवी काढून घेतलेले ते पहिले व्यक्ती होत. १९६० मध्ये त्यांना डिग्री परत करण्यात आली मात्र आजही त्यांचं नाव मुंबई विद्यापीठाच्या अॅल्युमनीमध्ये दिसून येत नाही. ते समाविष्ट करायला हवे, यासंबंधात कुलगुरूंनीही पुढाकार घ्यायला हवा, असेही रणजित सावरकर यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.