भगूर येथील भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantryaveer Savarkar) समुहाच्या वतीने शहरातील मध्यवर्ती ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील स्वातंत्र्यवीर सावरकर मूर्तीजवळ हिंदुत्वाची गुढी उभारून हिंदू नववर्षाचे स्वागत जल्लोषात करण्यात आले. (Swatantryaveer Savarkar)
यावेळी ह.भ.प. श्री गणेश महाराज करंजकर (Shri Ganesh Maharaj Karanjkar) व योगेश बुरक (Yogesh Burak) यांच्या हस्ते अनुक्रमे छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) व स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantryaveer Savarkar) यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी गणेश महाराज म्हणाले की, इंग्रजी नवीन वर्ष ३१ डिसेंबरला रात्री १२ वाजून १ सेकंदाने सुरू होते; कारण पाश्चात्य संस्कृती आपल्याला प्रकाशाकडून अंधाराकडे नेते, ती भोगी संस्कृती आहे. परंतु आपली हिंदु संस्कृती चैत्र महिन्यामध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्याचे पहिले किरण या पृथ्वीवर पडले की, नवीन वर्षाला सुरुवात होते. हिंदु नवीन वर्ष आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेणारे आहे. त्यामुळे मराठी चैत्र महिन्यापासून नवीन वर्षाला सुरुवात होते.
(हेही वाचा- नाराज Congress सांगलीत उबाठाच्या उमेदवाराला पाडणार?)
प्रसंगी मनोज कुवर यांनी सूत्रसंचालन केले तर यावेळी समूहाचे मंगेश मरकड, प्रशांत लोया, प्रविण वाघ, संभाजी देशमुख, सुनिल जोरे, भूषण कापसे, प्रसाद आडके, उमेश मोहिते, खंडू रामगडे, दिपक गायकवाड, संदेश बुरके, आशिष वाघ, दिगंबर करंजकर, ओम देशमुख, शाम देशमुख, गणेश सूर्यवंशी, बाळा कापसे, आकाश नेहरे, निलेश हासे, केशव करंजकर, भाऊसाहेब ससाणे, साई गायकवाड आदी सभासद उपस्थित होते. (Swatantryaveer Savarkar)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community