स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनी वाहिली आदरांजली

125
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ५६व्या आत्मार्पण दिनाच्या निमित्ताने वीर सावरकर यांच्या सशस्त्र क्रांती आणि समाजप्रबोधनाच्या कार्याचे स्मरण करण्यात आले. शनिवार, २६ फेब्रुवारी रोजी सकाळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे वीर सावरकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या नेत्यांनी यानिमित्ताने वीर सावरकर यांना भावपूर्ण अभिवादन केले.

भाजपच्या नेत्यांची उपस्थिती 

यानिमित्ताने स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे आयोजित कार्यक्रमात आमदार आशिष शेलार, भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्यासोबत सचिन शिंदे, विलास आंबेकर, विवेक भाटकर, अक्षता तेंडुलकर, रवी  मेणकुरकर यांच्यासह महत्वाच्या व्यक्तींची उपस्थिती होती. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अरविंद विठ्ठल कुळकर्णी यांनी वीर सावरकर यांच्या कार्याविषयी माहिती दिली.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.