डेक्कन एज्युकेशन सोसायटीतर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर व्याख्यानमाला!

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे देशाप्रति असणारे समर्पण सर्वश्रुत आहेच आणि ते डे. ए. सोसायटीच्या फर्ग्युसन महाविद्यालयाचे विद्यार्थी होते. ही गोष्ट आपल्या दृष्टीने अभिमानाची व अस्मितेची आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथी दिनाचे औचित्य साधून डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे च्यावतीने ‘स्वातंत्र्यवीर सावरकर व्याख्यानमाला’ दि. २० फेब्रुवारी, २०२१ आणि २२ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी, २०२१ या कालावधीत प्रत्येक दिवशी सायं. ६ वा. ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आली आहे. सदर व्याख्यानमालेचा तपशील सोबत जोडला आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रसारण डेक्कन एज्युकेशनच्या यु-ट्यूब चॅनेलद्वारे दाखविण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी धनंजय कुलकर्णी (कार्यवाह, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे.) यांच्याशी संपर्क साधावा.

व्याख्यानमालेचा तपशील खालीलप्रमाणे:

दिवस १ – शनिवार,२०.०२.२०२१ – ‘स्वातंत्र्य लक्ष्मी की जय- अभिनव भारत स्थापना आणि कार्य’- श्री. योगेश सोमण- https://youtu.be/Ht_iTTS7Aus

दिवस २ – सोमवार, २२.०२.२०२१ – ‘सावरकर आणि विवाद’ – श्री. वैभव पुरंदरे- https://youtu.be/pWpM0flRUNc

दिवस ३ – मंगळवार, २३.०२.२०२१ – ‘समाजसुधारक सावरकर’ – श्री. अक्षय जोग- https://youtu.be/sLp4eTdz1vc

दिवस ४ – बुधवार, २४.०२.२०२१ – ‘क्रांतीकारक सावरकर’ – श्री. विक्रम संपत- https://youtu.be/1GePuTucHaI

दिवस ५ – गुरुवार, २५.०२.२०२१ – ‘अंदमानपर्व’ – श्रीमती मीना प्रभू- https://youtu.be/edyFNPWriyI

दिवस ६ – शुक्रवार, २६.०२.२०२१ – ‘टिळक आणि सावरकर’ – श्री. नितीन आपटे- https://youtu.be/cNvQ2wVIn2o

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here