मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात 2021 चा दीक्षांत समारंभ सोमवारी संपन्न झाला. हा कार्यक्रम वेबकास्टही करण्यात आला होता. रत्नागिरीच्या विद्यार्थीनीला विज्ञान शाखेत प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती सुवर्णपदक प्रदान करण्यात आले.
म्हणून दिला जातो पुरस्कार!
विज्ञान विषयाला प्रोत्साहन देण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती सुवर्णपदक दिले जाते. 2010 मध्ये या पुरस्काराची स्थापना स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे तत्कालीन अध्यक्ष प्रा. सुधाकरराव देशपांडे यांनी केली. याअंतर्गत मुंबई विद्यापीठ, पुणे विद्यापीठ आणि नागपूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांना मराठी भाषा, विज्ञान आणि इतिहास या विषयात प्रथम क्रमांक मिळवणा-या विद्यार्थी वा विद्यार्थीनीला हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. स्वातंत्र्यवीर सावरकर हे नेहमीच ज्ञान, विज्ञान आणि संशोधनाचे प्रशंसक आणि प्रेरणादायी होते. विज्ञानावर आधारित धर्म त्यांनी नेहमीच मान्य केला होता. त्यांच्या मताचा आदर करून मुंबई विद्यापीठात दरवर्षी विज्ञान शाखेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती सुवर्णपदक प्रदान केले जाते.
( हेही वाचा: मुंबई उच्च न्यायालय म्हणतं, ‘महिलेच्या पायांना स्पर्श करणं म्हणजे विनयभंगच’ )
ती जिद्द मी अंगीकारली
मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राची विद्यार्थिनी प्रियंका पेंढारी हिला विज्ञान शाखेत उत्कृष्ट गुण मिळाल्याबद्दल 2021 चा स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती सुवर्ण पदक देण्यात आला. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्वभावात जी जिद्द होती, तो स्वभाव मी अंगीकारला आणि त्याचा परिणाम आज सर्वांसमोर असल्याचे सुवर्ण पदक विजेत्या प्रियांकाने यावेळी म्हटले.
राज्यपालांची उपस्थिती
या कार्यक्रमाला राज्यपाल आणि विद्यापीठांचे कुलपती भगतसिंग कोश्यारी, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, कुलगुरू सुहास पेडणेकर आणि विद्यापीठांचे अधिकारी आणि शिक्षणतज्ज्ञ उपस्थित होते. दीक्षांत समारंभात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे महाराष्ट्राचे युवा मंत्री आदित्य ठाकरे यांना वारंवार प्रोत्साहन देताना दिसले.
Join Our WhatsApp Community