स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात स्वातंत्र्य दिन साजरा

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई येथे ७४ व्या स्वातंत्र्य दिनी प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते दिग्पाल लांजेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी स्मारकाच्या कोषाध्यक्षा मंजिरी मराठे तसेच कार्यवाह राजेंद्र वराडकर उपस्थित होते.

कोरोनाच्या संकटामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये अगदी साधेपणाने तसेच सोशल डिस्टंसिंगचे पालन करून स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.

दरम्यान सावरकर वाडा, भगूर येथे देखील स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. नगराध्यक्षा अनिताताई करंजकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी मनोज बंडू कुवर आणि भूषण कापसे उपस्थित होते. भगूर येथील सावरकर वाड्याची देखभाल स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने करण्यात येत आहे.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here