स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातील ‘लाईट अँड साऊंड शो’ याचे वैशिष्ट्य म्हणजे या माध्यमातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनातील स्फूर्तिदायक प्रसंग दाखवले जातात. भारताला स्वातंत्र्य दिले नाही, तर हजारो क्रांतिकारकांच्या बलिदानामुळे ब्रिटिशांना भारत सोडणे भाग पडले. नेमके हेच या ‘लाईट अँड साऊंड शो’च्या माध्यमातून सांगितले जाते, जे दर्शकांच्या मनाचा नेमका ठाव घेते. असा हा शो पाहण्यासाठी रविवारी, ३० एप्रिल रोजी माहीम येथील सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती परस्पर सहाय्य मंडळाच्या तब्बल १५० सदस्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर Veer Savarkar राष्ट्रीय स्मारकात हजेरी लावली होती. या प्रसंगी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांचा सत्कार केला.
सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती परस्पर सहाय्य मंडळ या संस्थेच्या शतक महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने संस्थेने अनेक कार्यक्रम आयोजित केले आहेत, त्याचाच एक भाग म्हणून संस्थेचे शतक महोत्सवी वर्ष आणि महाराष्ट्र दिन याचे संयुक्त औचित्य साधून मंडळाच्या सदस्यांनी दादर पश्चिम येथील संयुक्त महाराष्ट्र कला दालन आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक यांना भेट देण्याचे आयोजले होते. त्यानुसार मंडळाच्या १५० सदस्यांनी सावरकर स्मारकाला Veer Savarkar भेट दिली आणि ‘लाईट अँड साऊंड शो’ पाहिला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष विनोद काशिनाथ पाटील, प्रमुख कार्यवाह लक्ष्मीकांत राऊत, विश्वस्त युक्ती पाटील आणि कार्यक्रम प्रमुख राजन देसाई इत्यादी उपस्थित होते.
(हेही वाचा #Veer Savarkar वीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त दर्शनासाठी स्मारकात तरुणाईचा ओघ)
Join Our WhatsApp Community