या वर्षी राज्यात मोठ्या धुमधडाक्यात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होत आहे. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी शिवरायांची लिहिलेली आरती शिवप्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्र ठरली, यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने शिवरायांच्या आरतीचा खास व्हिडिओ तयार केला आहे. त्याला सोशल मीडियावर उत्तम प्रतिसाद मिळत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी शिवरायांवरील ही आरती ट्विट केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा!!! #शिवजयंती #veersavarkar pic.twitter.com/PFIzs5ufj0
— Ranjit Savarkar (@RanjitSavarkar) February 19, 2023
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर लिहिलेली आरती शिवरायांचे कार्य आणि कर्तृत्वाचा गौरव करणारी आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने प्रसिद्ध केलेल्या या व्हिडिओमधील आरती वीर सावरकर यांनी लिहिलेली असून राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी ती गायली आहे. हा व्हिडिओ शिवजयंतीच्या दिनी सोशल मीडियात सर्वत्र प्रसारित होत आहे. विशेष म्हणजे मुंबई भाजपनेही या वर्षी शिवजयंतीच्या दिवशी मुंबईतील २२७ विभागांमध्ये वीर सावरकर यांनी शिवरायांवर लिहिली आरती म्हणण्याचा उपक्रम राबवला आहे.
(हेही वाचा छत्रपती शिवाजी महाराज कसे दिसायचे?)
वीर सावरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिलेली आरती
जयदेव जयदेव जय जय शिवरायाया या अनन्यशरणा आर्यां ताराया
आर्यांच्या देशावरि म्लेच्छांचा घालाआला आला सावध हो शिवभूपाला !सद्गदिता भूमाता दे तुज हांकेलाकरुणारव भेदुनी तव हृदय न कां गेला
जयदेव जयदेव जय जय शिवराया
श्री जगदंबाजीस्तव शुंभादिक भक्षीदशमुख मर्दुनि जी श्रीरघुवर संरक्षीती पूता भूमाता म्लेंच्छांही छळतांतुजविण शिवराया तिज कोण दुजा त्राता?जयदेव जयदेव जय जय शिवराया
त्रस्त अम्ही दीन अम्ही शरण तुला आलोंपरवशतेच्या पाशीं मरणोन्मुख झालोंसाधु परित्राणाया दुष्कृती नाशायाभगवन् भगवद्गीता सार्थ कराया या
जयदेव जयदेव जय जय शिवराया
ऐकुनिया आर्यांचा धावा महिवरलाकरुणोक्ते स्वर्गी श्री शिवनृप गहिवरलादेशास्तव शिवनेरी घेई देहालादेशास्तव रायगडी ठेवी देहालादेशस्वातंत्र्याचा दाता जो झालाबोला तत् श्रीमत्शिवनृप् की जय बोला
जय देव जय देव जय जय शिवराया ||