स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात रविवारी प्रजासत्ताक दिन (Republic Day) उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सेना पदक (शौर्य) निवृत्त कर्नल विजय भावे ( Retired Colonel Vijay Bhave) यांच्या हस्ते ध्वजावतरण करण्यात आले. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्यवाह राजेंद्र वराडकर (Rajendra Varadkar), स्मारकाचे सहकार्यवाह आणि ‘हिंदुस्थान पोस्ट’चे संपादक स्वप्नील सावरकर (Swapnil Savarkar), यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
( हेही वाचा : Davos दौऱ्याचे राजकारण आणि महाराष्ट्राचा आर्थिक फायदा)
यावेळी स्मारकाचे कार्यवाह राजेंद्र वराडकर (Rajendra Varadkar) यांनी निवृत्त कर्नल विजय भावे ( Retired Colonel Vijay Bhave) यांचा परिचय श्रोत्यांना करून दिला. निवृत्त कर्नल विजय भावे श्रोत्यांना संबोधित करताना म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात २६ जानेवारीला आपण आवर्जून उपस्थित राहिलात त्याबद्दल मी तुमचे विशेष कौतुक करतो. कारण १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी हा सुट्टीचा दिवस मानला जातो. पण तसे न करता आपण आवर्जुन उपस्थित राहिलात, असे म्हणत त्यांनी उपस्थितांचे कौतुक केले. (Republic Day)
भावे ( Retired Colonel Vijay Bhave) म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणायचे, देहाकडून देवाकडे जाताना मधे देश लागतो आणि आपण त्या देशाचे देणे लागतो. त्यामुळेच देशासाठी कार्य करणाऱ्यांना अभिवादन करण्यासाठी आपण इथे आलात ते महत्त्वाचं. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशासाठी खुप मोठे कार्य केले असून यादिवशी त्यांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी आपण इथे आलात त्याबद्दल धन्यवाद. (Republic Day)
पुढे कर्नल भावे ( Retired Colonel Vijay Bhave) म्हणाले की, देशासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकाचे स्मरण करणे गरजेचे आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात (Swatantryaveer Savarkar Rashtriya Smarak) याआधी ही येण्याचे मला भाग्य मिळाले. त्यामुळे आजच्या दिवशी सावरकर स्मारकात ध्वजावतरण करण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी अविस्मरणीय आठवण आहे. स्वातंत्र्याचे महत्त्व आपल्या लक्षात असायला हवे. येणाऱ्या पिढ्यांना स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व पटवून दिले पाहिजे. त्यासाठी आपल्या कर्तव्यांचा विसर पडता कामा नये. सैन्यात जाणे हे एक कर्तव्य आहे, परंतु माझे वडील म्हणायचे की, या देशातील जो व्यक्ती आपले काम इमाने इतबारे करतोय, तो सुद्धा त्याचे कर्तव्य तितक्याच प्रामाणिकपणे निभावतोय. ते आपण सुद्धा निभावाल हीच अपेक्षा. (Republic Day)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community