Swati Mohol Meet Devendra Fadanvis : कुख्यात गुंड शरद मोहोळच्या पत्नीने घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

Swati Mohol Meet Devendra Fadanvis : स्वाती मोहोळ यांनी ढोले पाटील रोडवरील पुणे शहर भाजपाच्या नव्या कार्यालयाजवळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

765
Swati Mohol Meet Devendra Fadanvis : कुख्यात गुंड शरद मोहोळच्या पत्नीने घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
Swati Mohol Meet Devendra Fadanvis : कुख्यात गुंड शरद मोहोळच्या पत्नीने घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

कुख्यात गुन्हेगार शरद मोहोळ (Sharad Mohol) याचा त्याच्याच साथीदाराने भरदिवसा खून केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली. शरद मोहोळवर त्याच्या साथीदारांनी मागून सलग चार गोळ्या झाडल्या. त्यातील ३ गोळ्या मोहोळला लागल्या. त्याला तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले; परंतु त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. (Swati Mohol Meet Devendra Fadanvis)

(हेही वाचा – Maratha Reservation : कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही; अजित पवारांचा जरांगेंना इशारा)

स्वाती मोहोळ भाजपच्या पदाधिकारी

शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ (Sharad Mohol Wife) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची भेट घेतली आहे. स्वाती मोहोळ यांनी ढोले पाटील रोडवरील पुणे शहर भाजपाच्या नव्या कार्यालयाजवळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. स्वाती मोहोळ या पुणे भाजपच्या पदाधिकारी असून त्यांनी गेल्या वर्षी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर शरद मोहोळ देखील राजकारणात येणार अशी चर्चा होती.

खून प्रकरणी आता देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर गृहमंत्री कोणते निर्देश देणार, हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस आणि स्वाती मोहोळ यांच्यात काय चर्चा झाली, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

(हेही वाचा – BMC : संपूर्ण स्वच्छता मोहिमेमुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारली – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे)

गुंडांचा बंदोबस्त शासनाद्वारेच केला जातो – फडणवीस 

पुणेच नाही, तर राज्यात कुठेही टोळीयुद्ध (Gang War) होणार नाही. कायदा आणि सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होणार नाही. सदर कुख्यात गुंडांची हत्या त्याच्याच साथीदारांनी केली आहे. गुंड कुणीही असो, त्याचा बंदोबस्त शासनाद्वारेच केला जातो, त्यामुळे असे टोळीयुद्ध करण्याचा कुणीही प्रयत्न करणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. त्यामुळे शरद मोहोळची पत्नी आणि उपमुख्यमंत्री यांच्यात काय चर्चा झाली असेल यावर तर्क-वितर्क लावले जात आहेत.

शरद मोहोळ हत्या प्रकरणातील आरोपी

या प्रकरणी आतापर्यंत साहिल ऊर्फ मुन्ना पोळेकर, विठ्ठल किसन गडले, अमित मारुती कानगुडे, नामदेव महिपत कानगुडे, चंद्रकांत शाहु शेळके, विनायक संतोष घवाळकर, रवींद्र वसंतराव पवारआणि संजय रामभाऊ उउ्डाण यांची नावे समोर आली आहेत. (Swati Mohol Meet Devendra Fadanvis)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.