सचिन धानजी, मुंबई
मुंबईच्या रस्त्यांसह वस्त्यांमधील कचऱ्याची साफसफाई करण्यासाठी कार्यरत असणाऱ्या सफाई कामगारांसाठी (Sweepers) विविध ठिकाणी बनवण्यात येणाऱ्या हजेरी चौक्यांची दुरावस्था झाल्या आहेत. त्यामुळे पत्र्याच्या या चौक्यांना गंज लागल्याने याठिकाणी नव्याने आता चौक्यांची उभारणी केली जाणार आहे. त्यामुळे मुंबईत तब्बल १०० नवीन हजेरी चौक्या बांधल्या जाणार असून या प्रत्येक चौकीसाठी सुमारे २४ लाख रुपये मोजले जाणार आहेत. दोन वर्षांपूर्वी याच प्रकारच्या चौक्यांची उभारणी करताना प्रत्येकी १७ लाख ६२ हजार रुपये मोजण्यात आले होते. त्यामुळे दोन वर्षांत या प्रत्येक चौकीसाठी सुमारे सहा कोटी रुपये अधिक मोजले जात आहेत.
मुंबईत स्वच्छता राखणाऱ्या सफाई कामगारांची (Sweepers) हजेरी नोंदवण्यासाठी तसेच गाड्यांच्या मोटर लोडरकरता चौक्या बनवण्यात आल्या आहेत. या चौक्यांमध्ये जावून प्रत्येक सफाई कामगार आणि मोटर लोडर हा आपली हजेरी नोंदवत असतो. पूर्वी महापालिकेच्या सफाई कामगारांच्या (Sweepers) चौक्या या पक्क्या बांधकामाच्या होत्या. परंतु आता जागेअभावी महापालिकेने पत्र्याच्या चौक्यांची उभारणी केली. यापूर्वी मुंबई महापालिकेने मुंबईतील विविध ठिकाणी सन २०१०मध्ये २४० आधुनिक आणि आदर्श चौक्यांची उभारणी केली होती. परंतु तेरा वर्षांनंतर यापैंकी अनेक चौक्यांना गंज लागून ते खराब झाले आहेत. त्यामुळे अशाप्रकारे मोडकळीस आलेल्या चौक्यांची जागी नव्याने चौक्या उभारण्याचा निर्णय महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाने घेतला आहे. यासाठी १०० चौक्यांची उभारणी केली जाणार असून यासाठी प्रत्येकी २३ लाख ५६ हजार ७०० रुपये खर्च केले जाणार आहे.
या १०० चौक्यांचे संकल्पचित्र तयार करून त्याची उभारणी करण्यासाठी सुमारे २४ लाख रुपये खर्च केले जाणार असून यासाठी सॅटेक एनव्हायर इंजिनिअरिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली आहे. या नव्याने बांधण्यात येणाऱ्या १०० चौक्यांमध्ये आता पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छता गृह आणि कपडे बदलण्याची जागा, वस्तू आणि उपकरणे ठेवण्याची जागा, शिवाय कनिष्ठ पर्यवेक्षक याकरता स्वतंत्र कक्ष याप्रकारे या चौक्या आता वेगवेगळे स्वतंत्र कक्ष करून बांधल्या जातील.
यापूर्वी दोन वर्षांपूर्वी अशाचप्रकारे उभारणी करण्यात आलेल्या प्रत्येक चौकीसाठी १७ लाख ६२ हजार ८४९ रुपये मोजले होते. म्हणजे प्रति चौकी १९ लाख २५ हजार १२४ रुपयांमधून १ लाख ६२ हजारांची सुट देऊन प्रति चौकीसाठी १७.६२ लाख रुपये खर्च करण्यात आला होता. परंतु आता नव्याने १०० चौकी उभारताना त्यातील प्रती चौकीसाठी २४.८१ लाख रुपयांमध्ये १.२५ लाख रुपयांची सूट विचारात घेता यासाठी २३.५६ लाख रुपये मोजले जाणार आहे. त्यामुळे प्रती चौकीसाठी दोन वर्षांतच सहा लाख रुपये अधिक मोजले जात असल्याचे पहायला मिळत आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सफाई कामगारांना (Sweepers) हजेरीसाठी चौक्यांवर जावे लागते. या कर्मचाऱ्यांचा नेहमीच संपर्क हा कचऱ्याशी येत असल्याने त्यांना काम पूर्ण झाल्यावर हातपाय धुणे आवश्यक असतात. हात पाय धुण्याची सुविधा आधीच्या चौक्यांवर नसल्यामुळे या कामगारांना असुविधांचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे २०१०मध्ये २४० नवीन चौक्यांची उभारणी करण्यात आल होती. परंतु आता त्यातील काही चौकी मोडकळीस आल्याने त्या जागी नवीन १०० चौकी उभारण्यात येत आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community