Swimming Pool : अंधेरी पूर्व कोंडीविटा येथील तरण तलावाचे लोकार्पण, २ एप्रिलपासून होणार सुरु

तरण तलावाचे 'छत्रपती संभाजी महाराज तरण तलाव' असे नामकरण

759
Swimming Pool : अंधेरी पूर्व कोंडीविटा येथील तरण तलावाचे लोकार्पण, २ एप्रिलपासून होणार सुरु

अंधेरी पश्चिमेपाठोपाठ आता अंधेर पूर्व भागातही तरण तलावाची (Swimming Pool) निर्मिती करण्यात आली असून यांचे लोकार्पण सोमवारी पार पडले आहे. अंधेरी पूर्व मधील नागरिकांसाठी हा तरण येत्या २ एप्रिलपासून खुला केला जाणार आहे. या तरण तलावासाठी आतापर्यंत २८०० सभासदांची ऑनलाईन नोंदणी झालेली आहे. (Swimming Pool)

अंधेरी (पूर्व) येथील कोंडीविटा परिसरातील तरण तलावाचे (Swimming Pool) मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते सोमवारी ११ मार्च २०२४ लोकार्पण करण्यात आले. यावेळी स्थानिक आमदार पराग अळवणी, सह आयुक्त (परिमंडळ ३) रणजित ढाकणे, के पूर्व विभागाचे सहायक आयुक्त मनीष वळंजू आदी मान्यवर उपस्थित होते. (Swimming Pool)

अंधेरी (पूर्व) कोंडीविटा येथील तरण तलाव महानगरपालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील योग्य समन्वयामुळे अवघ्या १७ महिन्यात तयार झाला. हा समन्वय असाच ठेवला, तर विकासाच्या वाटेत कोणताच अडथळा येणार नाही. छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस असल्याने या तरण तलावाचे नामकरण ‘छत्रपती संभाजी महाराज तरण तलाव’ असे करण्यात येत असल्याचे राज्याचे कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री तसेच मुंबई उपनगरे जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी जाहीर केले. (Swimming Pool)

मंत्री लोढा यांनी नागरिकांशी थेट संवाद साधला. यावेळी उपस्थित काही ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्याकडे ज्येष्ठांसाठी वाचनाची जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली. लोढा यांनी नागरिकांची ही मागणी लगेच मंजूर करून सहायक आयुक्तांना त्या संदर्भात निर्देश दिले. आमदार पराग अळवणी यांनी मनोगतात अंधेरीकरांसाठी एक चांगली वास्तू मिळाल्यामुळे महानगरपालिका प्रशासनाचे अभिनंदन केले. (Swimming Pool)

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल व अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनानुसार व मान्यतेनुसार या तरण तलावासाठी (Swimming Pool) ६ मार्चपासून ऑनलाईन सभासद नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. हा तरण तलाव पुढील महिन्यात म्हणजे २ एप्रिल २०२४ पासून खुला होणार असल्याची माहिती प्रास्ताविकातून सह आयुक्त रणजित ढाकणे यांनी दिली. तसेच अंधेरी पूर्व परिसरात महानगरपालिकेचा हा पहिलाच तरण तलाव असल्याचे ढाकणे यांनी नमूद केले. के पूर्व विभागाचे सहायक आयुक्त मनीष वळंजू यांनी आभार व्यक्त केले. (Swimming Pool)

(हेही वाचा – CAA ला विरोध का ? काय आहे वास्तविकता ?)

सहा दिवसांत २८०० नागरिकांनी केली नोंदणी

तरण तलावासाठी दिनांक ६ मार्च २०२४ पासून ऑनलाईन पद्धतीने नोंदणी सुरू झाली आहे. ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर ही नोंदणी सुरू आहे. २ एप्रिल २०२४ पासून हा तलाव नागरिकांसाठी खुला होणार आहे. आतापर्यंत तब्बल २८०० नागरिकांनी या तरण तलावासाठी नोंदणी केली आहे. (Swimming Pool)

अशी करा नोंदणी

या तरण तलावासाठी ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी https://swimmingpool.mcgm.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. ही प्रवेश प्रक्रिया “प्रथम येणाऱ्यास, प्रथम प्राधान्य” या पद्धतीने सुरू आहे. (Swimming Pool)

असा आहे तरण तलाव-

अंधेरी (पूर्व) येथील तरण तलाव एकूण ३१६० चौरस मीटर जागेत बांधण्यात आला आहे. तसेच १३०० चौरस मीटर क्षेत्रफळावर तलाव परिसरात उद्यान साकारले आहे. १८६० चौरस मीटर क्षेत्रफळावर २५ बाय १५ मीटर आकाराचा तरण तलाव आहे. तसेच महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृह आहेत. महिलांसाठी देखील स्वतंत्र तुकडी राहणार आहे. (Swimming Pool)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.