- सचिन धानजी, मुंबई
घाटकोपर (Ghatkopar) गाव येथील आर. एन. नारकर मार्गावरील ओडियन मॉलजवळील (Odeon Mall) भूखंडावर असलेल्या जलतरण तलाव आणि क्रिडा संकुलाची पुनर्बाधणी करण्यात येणार आहे. हा जलतरण तलाव (Swimming Pool) महापालिकेच्या मालकीचा असून त्यासाठी सुमारे ११८ कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. विशेष म्हणजे पाच मजली क्रीडा संकुलाच्या या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर हे २५ मीटर बाय ५० मीटर आकाराचे ऑलिम्पिक दर्जाचे स्विमिंग पूल बांधण्यात येणार आहे. महापालिकेचे मुंबईतील हे पहिले उत्तुंग जलतरण तलाव ठरणार आहे. मुंबई सह राज्यात असे ऑलिम्पिक दर्जाचे तरण तलाव इमारतीच्या वरच्या मजल्यावर बांधलेले नसून हे राज्यातील पहिले उत्तुंग तरण तलाव ठरेल असा महापालिकेला विश्वास आहे. (Swimming Pool)
घाटकोपर (Ghatkopar) पूर्व मधील आर. एन. नारकर मार्ग या महापालिकेच्या मालकीच्या (municipal corporation) आरक्षित असलेल्या ६४४६.६० चौ. मी. क्षेत्रफळाच्या भूखंडावर जलतरण तलाव असून याअस्तित्वात असलेल्या जलतरण तलावाचे पुनर्बांधकाम व नविन क्रिडा संकुलाचे बांधकाम करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे .’ जलतरण तलाव व क्रिडा संकुल इमारतीच्या बांधणीसाठी आराखडे तयार करून यासाठी निविदा काढण्यात आल्या. (Swimming Pool)
इमारतींच्या छतावर सौरऊर्जा
तळ अधिक ५ मजल्याची इमारत असून आर.सी.सी. बांधकाम, भितींच्या बांधकामासहित अंतर्गत व बाहेरील बाजूचे प्लास्टर तसेच रंगकाम, फरशी कामे, प्लंबिंगची कामे इत्यादीसह संपूर्ण इमारत उभारली जाणार आहे. संरक्षक भिंत, रेन वॉटर हार्वेस्टींग प्रणाली, पाण्याच्या टाक्या व पाणी पुरवठा यंत्रणा, ऑलिंम्पिक आकार जलतरण तलाव बांधकाम, इमारतींच्या छतावर सौरऊर्जा संच आदींचा समावेश आहे. (Swimming Pool)
(हेही वाचा- Bangladeshi Arrested : सीएए कायदा लागू झाल्यानंतर नवी मुंबईमधून ८ बांगलादेशी नागरिकांना अटक)
या खेळांचा असेल सामावेश
जलतरण तलाव उपकरणे आणि पाणी शुध्दीकरणाचे संयंत्राची देखभाल व दुरूस्ती, सौरउर्जा, बागकाम आदींचा सामावेश आहे. तसेच क्रिडा संकुलात लॉन टेनीस कोर्ट, बॅडमींटन कोर्ट, बास्केटबॉल,व्हॉलीबॉल,नेटबॉल,हॅन्डबॉल कोर्ट, बिलीयर्डस रुम,कार्ड-रुम, वाचन कक्ष, स्क्वॅश, कॅरम, पत्ते, टेबल टेनिस, रायफल शुटींग रेंज, व्यायामशाळा, मुष्ठीयुध्द क्षेत्र, आदींचा सामावेश असेल. या कामासाठी विविध करांसह सुमारे ११८ कोटी रुपये खर्च केला जाणार असूनव्या कामांसाठी स्कायवे इन्फ्राप्रोजेक्ट या कंपनीची निवड करण्यात आली आहे. (Swimming Pool)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community