Swimming Pool : पोहायला शिकायचे आहे का? चला तर महापालिकेच्या स्विमिंग पूलमध्ये!

Swimming Pool : मुंबईत महानगरपालिकेच्या १० तरण तलावांमध्ये मिळणार पोहण्याचे प्रशिक्षण

13782
Swimming Pool : पोहायला शिकायचे आहे का? चला तर महापालिकेच्या स्विमिंग पूलमध्ये!
Swimming Pool : पोहायला शिकायचे आहे का? चला तर महापालिकेच्या स्विमिंग पूलमध्ये!

विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबई महानगरपालिकेच्‍या १० जलतरण तलावांवर (Swimming Pool) उन्‍हाळी सुट्टी दरम्‍यान पोहण्‍याचे प्रशिक्षण देण्‍यासाठी २१ दिवसांचे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्‍यात येणार आहे. येत्या २ मे २०२४ पासून २१ दिवसांचे प्रशिक्षण सुरू करण्यात येणार आहे. तर याच प्रशिक्षणाच्या दुस-या कालावधीचा प्रारंभ  २३ मे २०२४ पासून होणार आहे. प्रशिक्षणासाठीची नाव नोंदणी पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यासाठीची लिंक बुधवारी २४ एप्रिल २०२४ सकाळी ११ वाजल्यापासून कार्यान्वित होणार आहे. (Swimming Pool)

(हेही वाचा- Hardik Pandya Net Worth : मुंबई इंडियन्सचा नवीन कर्णधार हार्दिक पांड्याची किती आहे संपत्ती ?)

‘जलतरण’ अर्थात ‘पोहणे’ हा जसा एक क्रीडा प्रकार आहे, त्याचप्रमाणे तो एक चांगला व्यायाम प्रकारही आहे. मुंबईकर नागरिकांना या क्रीडा व व्यायाम प्रकाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी मुंबईत  महानगरपालिकेचे १० (Mumbai Municipal Corporation) तरण तलाव कार्यरत आहेत. मात्र, अनेकदा पोहण्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण न मिळाल्याने अनेक इच्छुक या क्रीडा प्रकारापासून लांब राहतात. पोहणे शिकण्याची इच्छा असणाऱ्या मुंबईकरांना महानगरपालिकेने (Mumbai Municipal Corporation)  यंदाच्या उन्हाळ्यात अशी संधी उपलब्ध करून दिली आहे. (Swimming Pool)

महानगरपालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) १० जलतरण तलावांमध्ये  २ मे २०२४ पासून २१ दिवसांचे प्रशिक्षण सुरू करण्यात येत आहे. तर याच प्रशिक्षणाच्या दुस-या कालावधीचा प्रारंभ  २३ मे २०२४ पासून होणार आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी (Bhushan Gagrani) आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी (Dr. Amit Saini) यांच्या मार्गदर्शनानुसार आयोजित करण्यात येत असलेल्या या प्रशिक्षणासाठीची नाव नोंदणी पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. त्यासाठीची लिंक बुधवार,  २४ एप्रिल २०२४ पासून कार्यान्वित होणार असल्‍याची माहिती उप आयुक्त (उद्याने) किशोर गांधी यांनी दिली आहे. (Swimming Pool)

(हेही वाचा- Environmental Laws in India: पर्यावरणाविषयी ‘हे’ महत्त्वाचे कायदे तुम्हाला माहिती आहेत का?)

या जलतरण प्रशिक्षणासाठी माफक शुल्क आकारणी केली जाणार आहे. पंधरा वर्षांपर्यंतची मुले, ६० वर्षांपुढील नागरिक, दिव्‍यांग व्‍यक्‍ती यांच्‍यासाठी २ हजार १०० रूपये, तर १६ ते ६० वयोगटातील नागरिकांसाठी ३ हजार १५० रूपये शुल्क आकारले जाणार आहे. (Swimming Pool)

१० जलतरण तलावांमध्ये  २ मे २०२४ ते दिनांक २२ मे २०२३ आणि  २३ मे २०२४ ते दिनांक १२ जून २०२४ या कालावधी दरम्यान जलतरण प्रशिक्षण दिले जाणार आहे. जलतरण प्रशिक्षण हे दररोज दुपारी १२.३० ते १.३०, दुपारी २ ते ३ आणि ३.३० ते ४.३० अशा तीन तुकड्यांमध्ये २१ दिवस आयोजित केले जाणार आहे. (Swimming Pool)

(हेही वाचा- Congress ने दलित आणि मुस्लिमांचा व्होट बँक म्हणून वापर केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे टीकास्त्र)

या विशेष उन्हाळी सत्राची सभासद नोंदणी फक्त ऑनलाईन पध्‍द्तीनेच दिनांक २४ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजेपासून सुरू होणार आहे. तर, दिनांक २३ मे २०२४ ते दिनांक १२ जून २०२४ या कालावधीतील प्रशिक्षण वर्गाची सभासद नोंदणी दिनांक ६ मे २०२४ पासून सुरू करण्‍यात येईल. (Swimming Pool)

सभासदत्वासाठी https://swimmingpool.mcgm.gov.in/ या लिंकचा उपयोग करावा. सभासद नोंदणीच्‍या चौकशीसाठी १८००१२३३०६० या टोल फ्र‍ि क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई महानगरपालिका (Mumbai Municipal Corporation) प्रशासनाकडून करण्‍यात येत आहे. (Swimming Pool)

(हेही वाचा- World Book Day 2024 : सर्वोत्कृष्ट मराठी ८ पुस्तके; एकदा नक्कीच वाचा!)

प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेल्‍या तलावांची नावे पुढीलप्रमाणे :-

१. महात्मा गांधी स्मारक ऑलिंपिक जलतरण तलाव, दादर (पश्चिम)
२. जनरल अरूणकुमार वैद्य ऑलिंपिक जलतरण तलाव, चेंबूर (पूर्व)
३. सरदार वल्लभभाई पटेल ऑलिंपिक जलतरण तलाव, कांदिवली (पश्चिम)
४. मुंबई महानगरपालिका दहिसर (पश्चिम) जलतरण तलाव, कांदरपाडा,दहिसर (पश्चिम)
५. मुंबई महानगरपालिका मालाड (पश्चिम) जलतरण तलाव, चाचा नेहरु मैदान, मालाड (पश्चिम)
६. मुंबई महानगरपालिका अंधेरी (पश्चिम) जलतरण तलाव, गिल्‍बर्ट हिल, अंधेरी (पश्चिम)
७. मुंबई महानगरपालिका अंधेरी (पूर्व) जलतरण तलाव, कोंडिविटा गाव, अंधेरी (पूर्व)
८. मुंबई महानगरपालिका वरळी जलतरण तलाव, वरळी जलाशय टेकडी, वरळी
९. मुंबई महानगरपालिका विक्रोळी जलतरण तलाव, टागोर नगर, विक्रोळी (पूर्व)
१०.बृहन्मुंबई महानगरपालिका वडाळा जलतरण तलाव, वडाळा अग्निशमन केंद्र, वडाळा

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.