Swine Flu : सावधान! राज्यात पसरतेय स्वाइन फ्ल्यूची साथ

221
Swine Flu : सावधान! राज्यात पसरतेय स्वाइन फ्ल्यूची साथ
Swine Flu : सावधान! राज्यात पसरतेय स्वाइन फ्ल्यूची साथ

दरवर्षी मान्सूनच्या सुरुवातीला मलेरिया, डेंगू, लेप्टो, अतिसार यासारखे साथीचे आजार (Swine Flu) पसरताना दिसतात. पण यंदा स्वाइन फ्लूच्या (Swine Flu) रुग्णात अचानक वाढ झाल्याने प्रशासनाची सुद्धा डोकेदुखी वाढली आहे. मुंबईसारख्या शहरात रुग्णांची झपाट्याने वाढ होताना दिसते. गेल्यावर्षी सुद्धा स्वाइन फ्लूच्या रुग्णात लक्षणीय वाढ होती. मागील वर्षी ३२ जणांनी स्वाइन फ्ल्यूमुळे जीव गमावला होता. (Swine Flu)

१५ जूनपर्यंत राज्यात ४३२ लोकांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे समजते, सरकारी वैद्यकीय आकड्यानुसार १५ जणांनी स्वाइन फ्ल्यूमुळे जीव गमावला आहे. थांबून थांबून पडणारा पाऊस आणि कडक ऊन या बदलत्या ऋतुचक्रामुळे वातावरण बदलले दिसते याचाच फायदा स्वाइन फ्ल्यूच्या प्रसारासाठी पोषक ठरतोय. मुंबईतील रुग्णालयात जूनच्या सुरुवातीपासून रुग्ण आढळून येत आहेत. (Swine Flu)

स्वाइन फ्ल्यू कसा ओळखाल ? (Swine Flu)

स्वाइन फ्ल्यूची लागण झाल्यास सुरुवातीला तुम्हाला अंग दुखणे, घसा दुखणे, सर्दी होणे, सतत नाक वाहणे, ताप येणे अशी लक्षणे आढळून येतील.स्वाइन फ्ल्यूला H1N1 वायरस नावाने ओळखले जाते. स्वाइन फ्ल्यू साथीचा रोग आहे स्वाइन फ्ल्यू बाधित व्यक्तींच्या संपर्कांत आल्याने रोगांची लागण होवू शकते. लहान मुले, गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिक, हृदय किंवा श्वासांना संबधित गंभीर आजार असणारी व्यक्ती, मधुमेही व्यक्ती यांची विशेष काळजी घेणे यांना स्वाइन फ्ल्यूचा सर्वाधिक धोका असू शकतो. कोणतेही लक्षणे आढळली तर त्यांवर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि वेळीच उपचार सुरु करा. (Swine Flu)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.