स्वाईन फ्लूने वाढवले पुणेकरांचे टेन्शन; रुग्णसंख्येत वाढ

69

कोरोनाकाळात कमी झालेल्या ‘स्वाईन फ्लू’(H1N1) या आजाराने आता पुन्हा डोके वर काढण्यास सुरूवात केली आहे. राज्यात गेल्या तीन महिन्यांमध्ये स्वाईन फ्लूच्या ४२७ रुग्णांची नोंद झाली असून, तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या इन्फ्लूएन्झा विषाणूचा उपप्रकार असलेल्या एच१एन१, एच२एन२, एच३एन२ विषाणूंचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून त्यापैकी सर्वाधिक रुग्ण स्वाईन फ्लूचे आहेत. मात्र, नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नसून, पुढील महिन्यात रुग्णसंख्या कमी होईल, असा विश्वास वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

( हेही वाचा : मुंबईत कांजूरमार्गमध्ये भीषण आग! ५ महिला जखमी, धुरामुळे गुदमरला नागरिकांचा श्वास)

स्वाईन फ्लूचा प्रादूर्भाव

कोरोनाकाळात २०२० आणि २०२१मध्ये स्वाईन फ्लूची रुग्णसंख्या कमी झाली होती. मात्र, आता पुन्हा स्वाईन फ्लूची रुग्णसंख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. स्वाईन फ्लूचा संसर्ग झालेल्या रुग्णांना न्यूमोनिया, बॅक्टेरिअल न्यूमोनिया, ब्रॉन्कायटिस असे आजार होण्याची शक्यता असते. मधुमेह, हृदयरोग अशा सहव्याधी असलेल्या रुग्णांना स्वाईन फ्लूची लागण झाल्यास अधिक त्रास होऊ शकतो. राज्यात गेल्या पाच वर्षांत स्वाईन फ्लूमुळे ९३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.