राज्यात कोरोना थांबला तर स्वाईन फ्लूने डोके वर काढले…

94

राज्यात कोरोनाकाळात कमी झालेल्या स्वाईनफ्लूने आता हळूहळू डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत सात महिन्यातच स्वाईनमुळे झालेल्या मृत्यूची संख्या जास्त असल्याने आरोग्य विभागाने स्वाईन फ्लू नियंत्रणासाठी कामाला सुरुवात केली आहे. राज्यात सहा महिन्यांत ७ जणांचा मृत्यू झाल्याने आता प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे आरोग्य विभाग सरसावले आहे.

( हेही वाचा : पुण्यातल्या दोन व्यावसायिकांना BA व्हेरीएंटची बाधा )

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोल्हापूरात स्वाईनफ्लूमुळे ३ तर ठाण्यात आणि पुण्यात प्रत्येकी २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या सात महिन्यांत १४२ जणांना स्वाईन फ्लूची बाधा झाली आहे. राज्यात सध्यस्थितीत ८१ स्वाईन बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यापैकी २९ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत.

स्वाईन फ्लूचे सर्वात जास्त रुग्ण मुंबईत

पालिका आरोग्य विभागाच्या नोंदीत १० जुलैनंतर मुंबईत झपाट्याने स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढल्याचे दिसून आले आहे. मुंबईत गेल्या सात महिन्यांत स्वाईन फ्लूचे ४३ रुग्ण आढळले आहेत. राज्यभरात ही रुग्णसंख्या सर्वात जास्त आहे. त्याखालोखाल पुण्यात स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून येत आहेत. पुण्यात स्वाईन फ्लूचे २३ तर पालघरमध्ये आतापर्यंत २२ स्वाईन फ्लूची बाधा झालेले रुग्ण सापडले आहेत. नाशिक येथे १७, नागपूरात आणि कोल्हापूरात प्रत्येकी १४, ठाण्यात ७ तर कल्याण डोंबिवलीत आतापर्यंत २ जणांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

गेल्या सहा वर्षांतील स्वाईन फ्लूची आकडेवारी

वर्ष – रुग्णसंख्या – मृत्यू

  • २०१६ – ८२ – २६
  • २०१७ – ६ हजार १४४ – ७७८
  • २०१८ – २ हजार ५९४ – ४६३
  • २०१९ – २ हजार २८७ – २४६
  • २०२० – १२१ – ३
  • २०२१ – ३८७ – २
  • २०२२ – ७ (२२ जुलैपर्यंत)

२० जुलैपर्यंतची माहिती

  • एकूण तपासण्यात आलेले रुग्ण – ५० हजार ६ हजार २९८
  • ऑसेलटॅमिवीर दिलेले संशयित फ्लू रुग्ण – ३ हजार ११५
  • बाधित रुग्ण – ८१
  • घरी सोडण्यात आलेले रुग्ण – ४८
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.