मुंबईत ‘स्वाईन फ्लू’चा कहर, सहा पटीने वाढले रुग्ण

93
मुंबईत गेल्या आठवड्याभरात स्वाईन फ्लू थेट सहा पटीने वाढल्याचे आरोग्य विभागाच्या पाहणीत दिसून आले. 14 जुलैपर्यंत मुंबईत केवळ 11 स्वाईन फ्लूचे रुग्ण होते. आता मुंबईत स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या 66 वर पोहोचली आहे.
एरव्ही हिवाळ्यात स्वाईन फ्लूचा उद्रेक पाहायला मिळतो. आता ऐन जुलै महिन्यात मुंबईत पावसाचा मारा वाढल्यानंतर गेस्ट्रो पाठोपाठ डेंग्यू आणि लॅप्टो आणि स्वाईन फ्लचे रुग्ण वाढतील, अशी भीती व्यक्त करण्यात येत होती. मुंबईत नेमक्या कोणत्या भागात स्वाईन फ्लू वाढतोय याची माहिती पालिका आरोग्य विभागाने दिली नाही.

जुलै महिन्यातील स्वाईन फ्लूच्या रुग्णांच्या नोंदी 

  • 10 जुलै – 3
  • 17 जुलै – 11
  • 24 जुलै – 66

स्वाईनफ्लूच्या आजाराची लक्षणे 

  • ताप, डोकेदुखी, अंगदुखी, घसादुखी, खोकला, थकवा
  • लहान मुलांमध्ये उलटी व जुलाब ही लक्षणे आढळतात

(हेही वाचा उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?)

स्वाईन फ्लू आजाराच्या प्रसाराचे माध्यम व निदान 

  • इन्फ्लूएन्झा या विषाणूमुळे स्वाईन फ्लू आजार होतो. हवेच्या माध्यमातून स्वाईन फ्लू पसरतो. आजारी व्यक्तीच्या शिंकण्यातून तसेच खोकल्यातून उडणा-या थेंबावाटे या आजाराचे विषाणू एका रुग्णापासून निरोगी व्यक्तीकडे जातात. किमान एक ते सात दिवसांत स्वाईन फ्लूची लागण होते.
  • आरटीपीसीआर तपासणीतून राज्यातील तीन आरोग्य केंद्रात स्वाईन फ्लूच्या रुग्णांचे निदान केले जाते. पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, मुंबईतील हाफकिन संशोधन संस्था तसेच कस्तुरबा संसर्गजन्य आजार रुग्णालयात ही चाचणी उपलब्ध आहे.

अतिजोखमीच्या व्यक्ती 

  • ५ वर्षांखालील मुले
  • ६५ वर्षांखालील प्रौढ व्यक्ती
  • दमा, हृदयाचे आजार, मूत्रपिंडाचे विकार, मधुमेह, यकृताचे विकार, रक्त किंवा चेतासंस्थांचे विकार असलेल्या रुग्णांना स्वाईन फ्लूची बाधा होण्याची दाट शक्यता असते
  • सततच्या आजारपणामुळे रोग प्रतिकारकशक्ती कमी झालेल्या, स्टॅरोईड्स प्रकारातील औषधे दीर्घ काळापासून घेणा-या व्यक्ती, एचआयव्ही बाधित रुग्ण
  • गरोदर महिला किंवा स्थूल व्यक्ती

(हेही वाचा शिवसेना, धनुष्यबाणावरील दाव्याबाबत सर्वोच्च न्यायालयात १ ऑगस्टला फैसला)

उपचार 

ऑसेलटॅमीवीर व झानामीवीर ही औषधे उपचारासाठी उपलब्ध आहेत. तसेच इंजेक्शनद्वारे तसेच नेसल स्प्रे स्वरुपातील लस उपलब्ध आहे.

काय टाळाल?

सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, धुम्रपान टाळा, लक्षणे आढळल्यास गर्दीत मिसळू नका

प्रतिबंधात्मक उपाय 

  • सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळा
  • डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नका
  • गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा
  • वारंवार हात स्वच्छ धुवा, पौष्टिक आहाराचे सेवन करा
  • लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्यांचे सेवन वाढवा
  • धूम्रपान टाळा
  • पुरेशी झोप आणि विश्रांती घ्या
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.