महाराष्ट्रातील नाशिक (Nashik) जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा (Swine Flu) शिरकाव झाला आहे. मालेगावातील (Malegaon) स्वाइन फ्लूने (Swine Flu) दोघांचा मृत्यू झाला आहे. या रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, असे आवाहन मालेगाव महापालिकेकडून करण्यात आले आहे. (Swine Flu)
(हेही वाचा- Dhananjay Munde: २०१७ मध्ये दिल्लीत कोणाच्या घरी बैठक झाली होती? धनंजय मुंडेंचा शरद पवारांवर हल्लाबोल)
मालेगावमध्ये स्वाइन फ्लूचा धोका वाढला
मालेगावात तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे असून स्वाइन फ्लूचा (Swine Flu) धोका वाढत आहे. मालेगावमधील ६३ वर्षीय महिलेचा ५ एप्रिल रोजी मृत्यू झाला होता. त्या महिलेस स्वाइन फ्लू झाल्यानंतर तिच्यावर नाशिकमध्ये (Nashik) उपचार सुरु होते. दुसरीकडे स्वाइन फ्लूचा (Swine Flu) प्रादुर्भाव होत असल्याने रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यानंतर आता दुसऱ्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यामुळे मालेगावमध्ये स्वाइन फ्लूचा (Swine Flu) धोका वाढला आहे. गेल्या २० दिवसांत दोन जणांचा मृत्यू झाल्यामुळे आरोग्य यंत्रणा खळबळून जागी झाली आहे. (Swine Flu)
(हेही वाचा- Kuno National Park : गांधीसागरच्या अभयारण्यात ५ ते ८ नवे चित्ते येणार )
आरोग्य विभागाचे आवाहन
सर्दी, खोकला, ताप व चालताना दम लागणे ही लक्षणे दिसत असल्यास तातडीने जवळचे महापालिका रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा आपला दवाखाना येथे तपासणी करून घ्यावी. औषधोपचार सुरू करावेत. घाबरून जाण्याचे कारण नाही. अशा सूचना महापालिका आरोग्य विभागाने केले आहेत. मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ.जयश्री अहिरे (Dr. Jayashree Ahire) यांनी पालिकेकडून उपाययोजना सुरु करण्यात आल्याची माहिती दिली. स्वाइन फ्लू बरा होतो, त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले. (Swine Flu)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community