छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार आणि कोहिनूर हिरा या दोन्ही गोष्टी सतत चर्चेचा विषय ठरतात. काही वर्षांपूर्वी महाराजांच्या वंशजांनी इंग्लंड येथे असलेली जगदंबा तलवार महाराष्ट्रात आणण्याची मागणी केली होती. त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लवकरच म्हणजेच २०२४ पर्यंत महाराजांची तलवार मायदेशी आणली जाणार, असे आश्वासन दिले आहे. त्यासाठी आम्ही सतत केंद्राच्या संपर्कात असल्याचेही त्यांनी सांगितले.
येत्या २०२४ साली महाराज्यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्ष पूर्ण होत आहेत. याचे औचित्य साधून महाराजांची जगदंबा तलवार महाराष्ट्रात घेऊन येण्याचे राज्य सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र ही तलवार केवळ एका वर्षभरासाठीच आणली जाणार असल्याची माहिती मिळते आहे.
(हेही वाचा केवळ सावरकरांचे पुतळे उभारून चालणार नाही, त्यांचे विचार पोहोचणे गरजेचे – रणजित सावरकर)
महाराजांच्या एकूण तीन लोकप्रिय तलवारी आहेत. अनुक्रमे ‘भवानी’, ‘जगदंबा’ आणि ‘तुळजा’ अशी त्यांची नावे आहेत. त्यापैकी भवानी आणि तुळजा या दोन तलवारी सध्या सातारा आणि सिंधुदुर्ग या किल्ल्यांवर आहेत. सुधीर मुनगंटीवार यांनी यूकेमधील अधिकाऱ्यांशी या बाबतीत चर्चा सुरु केली असल्याची माहिती दिली आहे.
Join Our WhatsApp Community