पश्चिम आशियामधील सीरिया (Syria) येथे सध्या अस्थिरता असून बंडखोरांनी राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद (Bashar al-Assad) यांची १४ वर्षांची सत्ता उलथवून टाकली आहे. यानंतर बशर अल-असद यांनी रशियात आश्रय घेतल्याची माहिती असून सीरियामध्ये अशांतता आहे. सीरियामधील अशांततेच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांनी भारताने मंगळवारी ७५ भारतीय नागरिकांना सीरियातून बाहेर काढले (75 Indian nationals evacuated from Syria) आहे. सर्व भारतीय नागरिक सुरक्षितपणे लेबनॉनला पोहोचले आहेत आणि ते उपलब्ध व्यावसायिक विमानांनी भारतात परततील, असे परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे. (Syria Update)
भारताने मंगळवारी (१० डिसेंबर) सीरियात अडकलेल्या ७५ नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढले आहे.सीरियातून बाहेर काढण्यात आलेल्या भारतीयामध्ये जम्मू-काश्मीरमधील ४४ यात्रेकरूंचा समावेश आहे.हे सैय्यदा जैनब (सीरियातील शिया मुस्लिमांचे एक धार्मिक स्थळ) येथे अडकले होते. सर्व भारतीय नागरिकांना सीरियातून बाहेर काढल्यानंतर सुरक्षितपणे लेबनॉन मार्गे विमानातून भारतात आणलं जाणार आहे. हयात तहरीर अल शामच्या बंडखोरांनी बशर अल असाद यांच्या सरकार हटवल्याच्या दोन दिवसांनी ही गोष्ट घडली आहे.
(हेही वाचा – Border – Gavaskar Trophy, Brisbane Test : ॲडलेड कसोटी लवकर संपल्यावर भारतीय संघाने तिथेच केला २ दिवस कसून सराव )
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने (Ministry of External Affairs) सांगितले की, भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेबद्दलचा संभाव्य धोका लक्षात घेऊन त्यांना देशातून बाहेर काढण्याचे काम दमास्कस आणि बैरूतमधील भारतीय उच्चायुक्तालयातून करण्यात आले. तसेच सरकार परदेशात भारतीय नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देते. परराष्ट्र मंत्रालयाने सीरियात राहणाऱ्या भारतीय नागरिकांना दमास्कसमधील भारतीय दूतावासाच्या संपर्कात राहण्याचा सल्ला दिला आहे. सरकार परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवणार आहे.असं परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community