टी-सिरीजचे संचालक भूषण कुमारवर बलात्काराचा गुन्हा दाखल!

टी-सिरीजच्या प्रोजेक्टमध्ये काम देण्याचे आमिष दाखवून सतत तीन वर्षे बलात्कार करत असल्याची तक्रार ३० वर्षीय महिलेने भूषणकुमार याच्यावर केली.

77

गीतकार गुलशन कुमार यांचे पुत्र आणि टी-सिरीजचे व्यवस्थापकीय संचालक भूषण कुमारवर अंधेरीच्या डी.एन. नगर पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. एका महिलेच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. टी-सिरीजच्या प्रोजेक्टमध्ये काम देण्याचे आमिष दाखवून सतत तीन वर्षे बलात्कार करत असल्याची तक्रार ३० वर्षीय महिलेने भूषणकुमार याच्यावर करण्यात आली आहे.

डी.एन. नगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टी-सिरीज कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक भूषण कुमार यांनी ३० वर्षीय तक्रारदार महिलेला त्यांच्या टी-सिरीज कंपनीच्या प्रोजेक्टमध्ये काम देण्याचे आमिष दाखवून मागील तीन वर्षांपासून तिच्यावर सतत बलात्कार केला. तसेच या महिलेचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली असे पीडित महिलेने पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. हा सर्व प्रकार २०१७ ते २०२० या कालावधीत झाला असून पीडित महिलेने अखेर गुरुवारी डी.एन. नगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी भूषण कुमार यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती डी.एन. नगर पोलिसांनी दिली आहे.

(हेही वाचा : यंदाचा दहावीचा निकाल ९९.९५ टक्के!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.