तर्पण फाउंडेशनच्या वतीने होणार टॅब वितरण

तर्पण फाउंडेशनच्या वतीने बालगृहातून बाहेर पडलेल्या आणि UPSC, MPSC च्या परीक्षेची तयारी करणा-या युवकांना टॅब देण्यात येणार आहे.

यासाठी शुक्रवार, २२ जुलै रोजी सायंकाळी ५.३० वाजता गरवारे क्लब हॉल, चर्चगेट येथे युवकांना टॅब वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. तसेच युवतींना १०३ नंबरच्या माध्यमातून सुरक्षेच्या हमीकरता मोबाईल देण्याचे ठरवले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर असणार आहेत. तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर असणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन तर्पण फाउंडेशनचे संस्थापक श्रीकांत भारतीय आणि तर्पण फाउंडेशनचे संचालक अजित चव्हाण यांनी केले आहे.

(हेही वाचा खासदार राहुल शेवाळे यांची बदनामी करण्याचे षडयंत्र – कामिनी शेवाळेंचा खुलासा)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here