आता भारतातही तबलिगी जमातवर बंदीची मागणी! ट्वीटरवर सुरू झाला ट्रेंड

141

तबलिगी जमात ही दहशतवादी संघटनांची एक संघटना असल्याचे सांगत इस्लाम धर्मांतरणाची मोहीम राबवणाऱ्या या संघटनेवर सौदी अरेबियाने बंदी घातली. भारताच्या बाबतीत याचे लक्षणीय परिणाम होऊ लागले आहेत. त्यामुळे आता कोरोना काळातही सर्व नियम फेटाळून लावणा-या तबलिगी जमातीवर पुन्हा टीका होण्यास सुरूवात झाली आहे. ट्वीटरवर याविषयीचा ट्रेंड सुरू झाला आहे.

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया केरल, तामीळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि राजस्थान येथील नागरिकांना तबलिगी जमातमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करत आहे. यामाध्यमातून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाची विचारधारा प्रसारित करण्यात यावी, हा या मागील छुपा अजेंडा आहे, असे जयश्रीकृष्ण यांनी ट्वीटरच्या माध्यमातून म्हटले आहे.

(हेही वाचा बहुजनांना एकत्र करण्यासाठी भाजपाचा ‘महोत्सव’)

तर सेहनाझ माल्ही यांनी ट्वीट करत म्हटले की, फजल-ए-अमल या पुस्तकातील तबलिगी जमात मुसलमानांना बिनबुडाच्या आधारहीन गोष्टी शिकवतात, ज्याला कुराणामध्ये आधार नाही. हे प्रामाणिक आणि सभ्य मुस्लिम तरुणांसाठी धोक्याचे आहे, असे म्हटले.

विशाल पांडे यांनी ट्वीट करत म्हटले की, तबलिगी जमातचे प्रमुख हे तबलिगी जमात शांत आहे. जर तसे आहे तर या जमातीला बांगलादेशात का मशिदीत प्रवेश देत नाही, अशी विचारणा केली.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.