Chandrapur Tadoba Safari Booking : ताडोबा सफारी बुकिंगसाठीचा मार्ग खुला

स्थानिक व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला

177
Tadoba Safari Booking : ताडोबा सफारी बुकिंगसाठीचा मार्ग खुला
Tadoba Safari Booking : ताडोबा सफारी बुकिंगसाठीचा मार्ग खुला

चंद्रपुरातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ऑनलाईन बुकिंगसाठीचा (Tadoba Safari Booking) चंद्रपूर जिल्हा न्यायालयाने परवानगी दिली गुरुवारी (३१ ऑगस्ट) ही स्थगिती उठवत ताडोबाला सफारी बुकिंगसाठी परवानगी दिली आहे. यामुळे ताडोबा व्यवस्थापनासह रिसॉर्ट मालक, टूर ऑपरेटर, जिप्सी चालक, गाईड आणि स्थानिक व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामळे सुट्टीच्या काळात लोक या सफारीचा आनंद घेऊ शकणार आहे.

आर्थिक गैरव्यवहारामुळे वाईल्ड कनेक्टिव्हिटी सोल्युशन या बुकिंग करणाऱ्या एजन्सीसोबत ताडोबा व्यवस्थापनाने करार रद्द केला होता. डब्ल्यूसीएस कंपनीवर १२ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप वन विभागाने केला होता. त्यासंदर्भात वन विभागाने बुकिंग कंपनीच्या विरोधात पोलिसात गुन्हा देखील दाखल केला होता. मात्र ऑनलाईन तिकीट बुकिंग कंत्राटच्या अटी आणि त्यातील बुकिंगचा अधिकार हा वाद न्यायालयात गेला होता. २०२६ पर्यंत आपला करारनामा असताना ताडोबा व्यवस्थापनाने अचानक करार रद्द केल्याचं सांगत एजन्सीने चंद्रपूर न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने यावर सुनावणी करत तोडगा निघेपर्यंत ताडोबाच्या बुकिंग प्रक्रियेला स्थगिती दिली होती. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ताडोबातील सफारी बुकिंग प्रक्रिया ठप्प होती.

(हेही वाचा :Maratha Reservation : जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज)

२०२१ ते २३ चे ऑडिट झाल्यानं त्यामध्ये तब्बल २२ कोटी ८० लाख ६७ हजार ७४९रुपयांची तफावत आढळली, नेहमी शासनाला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, त्यामुळे ताडोबा व्यवस्थापनाने बुकिंग एजन्सीचे संचालक अभिषेक विनोदकुमार ठाकूर व रोहित विनोद कुमार ठाकूर या दोघांवर वन अधिकारी सचिन शिंदे यांच्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. या निर्णयामुळे चिंतेत सापडलेल्या ताडोबा व्यवस्थापनासह रिसॉर्ट मालक, टूर ऑपरेटर, जिप्सी चालक, गाईड आणि स्थानिक व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. येत्या काहीच दिवसात ताडोबाची अधिकृत बुकिंग साईट सुरु होण्याची शक्यता आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.