२६\११ दहशवादी हल्ल्याचा आरोपी Tahawwur Rana याला भारतात आणणार

65
२६\११ दहशवादी हल्ल्याचा आरोपी Tahawwur Rana याला भारतात आणणार
२६११ दहशवादी हल्ल्याचा आरोपी Tahawwur Rana याला भारतात आणणार

२६\११ चा मुंबईतील दहशतवादी हल्ला (Mumbai terrorist attack) आजही भारतीय विसरलेले नाहीत. दरम्यान या हल्ल्यातील पाकिस्तान वंशांचा कॅनडातील व्यापारी तहव्वुर राणा याला लवकरच भारताला सोपवण्यात येणार आहे. त्यामुळे भारतीय कुटनीतीचे हे मोठं यश मानले जाते. राणाला भारतात आणण्यासाठी आता कायदेशीर बाबींसोबतच राजकीय संबंधांचा वापर करण्यात येत आहे. अमेरिकन कोर्टाने (American Court) राणाची याचिका फेटाळल्यानंतर त्याला मोठा झटका बसला होता. (Tahawwur Rana)

( हेही वाचा : एअर मार्शल Jitendra Mishra यांनी भारतीय वायुसेनेच्या पश्चिम हवाई मुख्यालयाच्या प्रमुख पदाची स्वीकारली जबाबदारी

दरम्यान भारत-अमेरिका या दोन्ही देशांमधील प्रत्यार्पण संधी अंतर्गत राणाला भारतात सोपवण्यास न्यायालयाने मंजूरी दिली होती. त्याअंतर्गत आता राणाला भारतात आणण्याच्या हालचालींना वेग आला आहे. (Tahawwur Rana)

तहव्वुर राणावरील आरोप काय?

मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यात तहव्वूर राणा याचा हात असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले होते. दोषारोपपत्रातही त्याचे नाव आहे. राणा हा पाकिस्तानच्या (Pakistan) इंटर सर्व्हिसेज इंटेलिजेंस आणि दहशतवादी संघटना लष्कर-ए-तयब्बाचा सक्रीय सदस्य असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. तसेच मुंबई हल्ल्यातील मास्टरमाईंड डेव्हिड कोलमॅन हेडली याला राणा याने या हल्ल्यासाठी मदत केल्याचे ही तपासात उघड झाले होते. त्याचबरोबर हल्ल्याआधी मुंबईतील काही ठिकाणांची रेकी केल्याची माहिती ही पोलिसांनी दिली होती. (Tahawwur Rana)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.