मुंबईतील Taj Hotel बाहेर एकाच क्रमांकाच्या दोन कार; पोलिसांकडून तपास सुरु

143
मुंबईतील Taj Hotel बाहेर एकाच क्रमांकाच्या दोन कार; पोलिसांकडून तपास सुरु
मुंबईतील Taj Hotel बाहेर एकाच क्रमांकाच्या दोन कार; पोलिसांकडून तपास सुरु

मुंबई (Mumbai) येथील ताज हॉटेलममध्ये (Taj Hotel) एकसारख्या नंबर प्लेटच्या दोन गाड्या सापडल्या. या दोन्ही गाड्या एकाच मॉडेलची असून हॉटेलच्या (Taj Hotel) गेटच्या आत होत्या. त्यामुळे या दोन्ही गाड्या संशयास्पद वाटल्याने मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) ताज हॉटेल (Taj Hotel) आणि वाहने ताब्यात घेतली आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे. (Taj Hotel)

( हेही वाचा : Kasganj Violence प्रकरणी एनआयए न्यायालयाने २८ आरोपींना सुनावली जन्मठेपेची शिक्षा

दरम्यान ही दोन्ही वाहने पोलिसांनी कुलाबा पोलिस ठाण्यात नेली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दि. ६ जानेवारी रोजी दुपारी एकच्या सुमारास ही दोन्ही वाहने मुंबईतील ताज हॉटेलसमोर (Taj Hotel) उभी असलेली दिसली. त्यानंतर मूळ नोंदणी असलेल्या वाहन चालकाने याबाबत पोलिसांत तक्रार केली. या प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी वाहन ताब्यात घेतले. या वाहनांचा व्हिडिओही समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. यातील एक वाहन अर्टिगा आहे. ज्याचा क्रमांक MH01EE2388 आहे. तर मागे उभ्या असलेल्या कारचा क्रमांकही हाच आहे. मात्र दुसरे वाहन कोणत्या मॉडेलचे आहे हे कळू शकले नाही.(Taj Hotel)

याप्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) सांगितले की, आम्ही एका ड्रायव्हरविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. त्याने मुंबईतील ताज हॉटेलजवळ त्याच्या कारप्रमाणेच नंबर असलेली कार पाहिली आहे. तर दुसरीकडे एकाच क्रमांकाच्या दोन गाड्या सापडल्यानंतर सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. त्यामुळे हाय अलर्टवर असणाऱ्या ताज हॉटेलवर घडलेली घटना धक्कादायक आहे. (Taj Hotel)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.