तुम्ही पाहिले असेल २२ जानेवारी २०२४ रोजी राम मंदिराच्या (Rammandir Ayodhya) उद्घाटनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंदिर बांधणाऱ्या सर्व मजुरांचा कसा सन्मान करत होते. त्या वेळी पंतप्रधान मोदी मजुरांवर फुलांचा वर्षाव करत होते. तर, दुसरीकडे ताजमहाल बांधणाऱ्या मजुरांचे हात कापण्यात आले होते. इतिहासात कापड उद्योगातील अनेक उत्कृष्ट कारागिरांचे हातही कापले गेले होते. ज्यामुळे संपूर्ण परंपरा आणि वारसा नष्ट झाला. आज भारतात श्रमिकांचा आदर केला जात आहे. त्यांना सर्व प्रकारचे संरक्षण मिळत आहे. दुसरीकडे मात्र, असे राज्यकर्ते होऊन गेले ज्यांनी मजुरांचे हात कापले आणि उत्कृष्ट कापड कारागिरांचा वारसा आणि परंपरा नष्ट केली,” असे आदित्यनाथ (Yogi Adityanath) वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरम (World Hindu Economic Forum) कार्यक्रमात बोलताना म्हणाले.
(हेही वाचा – ताजमहाल बांधणाऱ्या मजुरांचे हात कापले होते, तर राममंदिर बांधणाऱ्यांचा सन्मान; Yogi Adityanath यांच्याकडून पंतप्रधानांचे कौतुक)
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ शनिवार, १४ डिसेंबरच्या रात्री मुंबईतील एका कार्यक्रमात बोलत होते. ताज महालच्या (Taj Mahal) मजुरांचे हात कापल्याचा दावा १७ व्या शतकात मुघल सम्राट शाहजहानने ताजमहलचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर मजुरांचे हात कापण्याचे आदेश दिल्याचे सांगितले जाते. हा दावा सिद्ध करणाऱ्या कोणत्याही ऐतिहासिक नोंदी आजपर्यंत सापडल्या नाहीत.
भारताचा इतिहास आणि वारसा याबद्दल पुढे बोलताना आदित्यनाथ (Yogi Adityanath) म्हणाले की, “काही लोकांना देशाची प्रगती किंवा भारतीयांना जागतिक स्तरावर मिळत असलेला आदर सहन होत नाही. जे आज भारताचा वारसा सांगत आहेत, ते देशाच संस्कृती अस्तित्वात आली तेव्हा जन्मलेही नव्हते.”
हेही पहा –
Join Our WhatsApp Community