परीक्षा काळात ध्वनीप्रदूषण करणार्‍या मशिदींवरील भोंग्यांवर कारवाई करा – सुराज्य अभियान

130

सध्या दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचा परीक्षा काळ चालू आहे. विद्यार्थी परिक्षांचा अभ्यास करत असतांना दिवसांतून पाच वेळा वाजणार्‍या मशिदींवरील भोंग्यांमुळे, तसेच अन्य काही लोकांकडून होणार्‍या ध्वनीप्रदूषणामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडचणी येत असल्याच्या तक्रारी येत आहेत. भल्या पहाटेपासूनच रात्रीपर्यंत कर्कश्श आवाजात भोंगे वाजत असतात. त्यामुळे सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कायद्याचे उल्लंघन करणार्‍यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’च्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भातील निवेदन महाराष्ट्राच्या गृहमंत्री कार्यालयात पाठवण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, तसेच सुप्रसिद्ध गायक सोनू निगम यांनी मशिदींवरील भोंग्यांतून होणार्‍या ध्वनीप्रदूषणाविषयी जोरदार आवाज उठवला होता; मात्र तत्कालीन शासनाने न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी जाणीवपूर्वक टाळली होती. आता केंद्रात आणि राज्यात सर्व समाजघटकांचे हित पहाणारे शासन सत्तेत आले आहे. त्यामुळे शासनाने या संदर्भात तातडीने ध्वनीप्रदूषण करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे, असे सुराज्य अभियानाचे समन्वयक डॉ. उदय धुरी यांनी निवेदनात म्हटले आहे.

(हेही वाचा महाराष्ट्र सत्तासंघर्ष: बहुमत चाचणीला सामोरे गेले असता तर..; सिंघवींच्या युक्तीवादावर सरन्यायाधीशांची महत्त्वाची टिप्पणी)

प्रत्येक मशिदीत दिवसातून पाच वेळा भोंगे वाजत असतात. एका भोंग्यातून कमीतकमी 120 डेसिबल इतक्या मोठ्या प्रमाणात आवाज येतो. ध्वनीप्रदूषण कायद्यानुसार 75 डेसिबल ही औद्योगिक क्षेत्रासाठीची कमाल मर्यादा आहे. निवासी भागांत तर ती 55 डेसिबल इतकीच मर्यादा आहे. त्यामुळे अशा भोग्यांना कायद्यानुसार अनुमती मिळू शकत नाही. असे एक नव्हे, तर प्रत्येक मशिदीवर किमान 4, 8 वा 12 भोंगे लावलेले असतात. यांतून किती ध्वनीप्रदूषण होत असेल, याची कल्पना करता येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यात आणि शांत झोप मिळण्यात अडचणी येत आहेत. या समस्येकडे एक गंभीर सामाजिक समस्या म्हणून पाहायला हवे. प्रथम किमान परीक्षा काळात तरी भोंगे बंद करायला हवेत. त्यानंतर अनधिकृतपणे आणि ध्वनीप्रदूषणाची मर्यादा ओलांडणार्‍या सर्वच मशिदींवरील भोंग्यांवर कारवाई करायला हवी, अशी मागणीही या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.