शाळेच्या आवारातील पानटपऱ्यांवर कारवाई करा; SCPCR ची मागणी

152
शाळेच्या आवारातील पानटपऱ्यांवर कारवाई करा; SCPCR ची मागणी

अवघ्या काही दिवसांत मुंंबईसह राज्यातील सर्वच शाळा सुरू होत आहे. शाळेच्या परिसरातील १०० मीटर अंतरावर असणाऱ्या पानटपऱ्यांवर बंदी आहे. परंतु, राज्यात शाळेच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री सर्रासपणे केली जातेय. त्यामुळे शाळकरी मुले व्यसनांच्या आहारी जात आहेत. ही बाब अतिशय गंभीर असून सरकारने शाळा परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवरील बंदीची कठोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या (SCPCR) अध्यक्षा ॲड. सुशीबेन शाह यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला व पोलीस महानिरिक्षक (महिला व बाल अत्याचार प्रतिबंधक विभाग, मुंबई) दीपक कुमार पांडे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. (SCPCR)

मुंबईत अनेक शाळा नागरी वस्तीच्या परिसरात आहेत. शिवाय बहुतांश ठिकाणी शाळा बाजार, दुकानांनी वेढलेल्या आहेत. या दुकानांमध्ये, स्टॉलमध्ये काही ठिकाणी तंबाखू, गुटखा, मावा, पान असे पदार्थ सर्रासपणे विकले जातात. विद्यार्थ्यांवर याचा परिणाम होऊन ते व्यवसानाच्या आहारी जात आहेत. शाळकरी मुले तंबाखू, गुटख्याच्या आहारी जातात. विद्यार्थांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावे, अशी मागणी ॲड. सुशीबेन शाह यांनी केली. (SCPCR)

१९ मे च्या रात्री पुण्यातल्या कल्याणी नगर परिसरात एक अल्पवयीन मुलगा दारूच्या नशेत भरधाव वेगात गाडी चालवत होता. हा मुलगा अवघ्या १७ वर्षांचा होता. त्याने एका बाईकला धडक दिली, दुर्दैवाने या घटनेत बाईकवरील दोघांनाही जीव गमवावा लागला. यासारख्या प्रकारांना आळा बसण्यासाठी शाळा परिसरातील तंबाखूजन्य पदार्थांच्या व मद्य विक्रीवरील बंदीची अंमलबजावणी करावी, अशी मागणी ॲड. सुशीबेन शाह यांनी केली आहे. (SCPCR)

(हेही वाचा – Russia and Ukraine War: रशियन लष्करात भरती झालेल्या २ भारतीयांचा युक्रेनने केलेल्या हल्ल्यात मृत्यू)

शाळेचा परिसर तंबाखूमुक्त ठेवा!

युवकांना तंबाखूच्या भीषण परिणामांची माहिती होणे गरजेचे आहे. त्यासाठी शाळा व महाविद्यालयांचा परिसर तंबाखूमुक्त ठेवावा. १०० यार्डांच्या आत अशा पदार्थांची विक्री न करण्याविषयी कारवाई करण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयांची देखील आहे.
– ॲड. सुशीबेन शाह, अध्यक्षा, राज्य बालहक्क संरक्षण आयोग. (SCPCR)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.