बांगलादेशामध्ये नवरात्रोत्सवाच्या काळात ३५ पूजा मंडपांवर झालेली आक्रमणे, पेट्रोल बाँब फेकणे, तसेच काली मंदिरात झालेली मुकुट चोरी यांची गंभीर नोंद घेत भारताच्या परराष्ट्र विभागाने गंभीर दखल घेतली आहे. परराष्ट्र विभागाने बांगलादेशातील हिंदू, तेथील सर्व अल्पसंख्यांक आणि मंदिरांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, अशी विनंती बांगलादेशाच्या (Bangladesh) अंतरिम सरकारकडे केली आहे.
(हेही वाचा – Rohingya मुसलमानांची हरियाणात घुसखोरी; मदरसेही चालवतात )
बांगलादेशात हिंदूंच्या प्रार्थनास्थळांवर झालेली आक्रमणे खेदजनक आहेत. बांगलादेशातील मंदिरे आणि श्रद्धास्थाने यांचा पद्धतशीर पावित्र्यभंग केला जात आहे. ढाक्याच्या तांतीबाजार येथील दुर्गापूजा मंडपावरील आक्रमण आणि सातखीरा येथील जोशेरोश्वरी काली मंदिरातील चोरी, यांची आम्ही गांभीर्याने नोंद घेतली आहे, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
बांगलादेशाच्या अंतरिम सरकारचे प्रमुख महंमद युनूस यांनी ढाक्यातील अनेक शतके जुन्या ढाकेश्वरी मंदिराला भेट दिली. ‘आम्हाला असा बांगलादेश उभारायचा आहे, जिथे प्रत्येक नागरिकाच्या अधिकाराचे रक्षण केले जाईल’, असे ते एका मंदिरातील कार्यक्रमात म्हणाले. प्रत्यक्षात मात्र हिंदूंना त्यांच्या सुरक्षेची चिंता आहे. पूजा मंडपांवर होणार्या आक्रमणांच्या घटनांमुळे चिंता आणि भीती आहे, अन्यथा नवरात्रीतील दुर्गापूजेचा सोहळा अधिक उत्साहात साजरा झाला असता, असे तेथील हिंदू नागरिकांनी सांगितले. (Bangladesh)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community