Anant Chaturdashi 2023 : गणपती विसर्जनात कशी घ्याल काळजी

217
Anant Chaturdashi 2023 : गणपती विसर्जनात कशी घ्याल काळजी
Anant Chaturdashi 2023 : गणपती विसर्जनात कशी घ्याल काळजी

गुरुवार, २८ सप्टेंबर २०२३ रोजी अनंत चतुर्दशी दिनी होणाऱ्या श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून विशेष तयारी करण्यात आली आहे. यंदा गणेश मूर्ती विसर्जनासाठी ६९ नैसर्गिक स्थळांसह एकूण १९८ कृत्रिम विसर्जनस्थळांवर व्यवस्था आहे, विसर्जन सुलभ, निर्विघ्नपणे पार पडावे यासाठी महानगरपालिकेचे सुमारे १० हजार कर्मचारी, ७१ नियंत्रण कक्ष तसेच अन्य विविध सोयीसुविधांसह सुसज्ज असून यासर्व नैसर्गिक विसर्जनाच्या ठिकाणी नागरिकांनी पावित्र्य व मांगल्य जपावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. समुद्रात मत्सदंशाची शक्यता असल्याने विशेष काळजी भाविकांनी घ्यावी असेही आवाहन महापालिकेने केला आहे.

विसर्जनादरम्यान कशी घ्याल काळजी
  • समुद्राच्या खोल पाण्यात जाण्याचा प्रयत्न करु नये.
  • मूर्ती विसर्जनाकरीता महानगरपालिकेमार्फत नेमलेल्या प्रशिक्षित मनुष्यबळाची मदत घ्यावी.
  • अंधार असणाऱ्या ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जनाकरीता जाणे टाळावे.
  • महानगरपालिकेने पोहण्याकरीता निषिद्ध केलेल्या क्षेत्रात जाण्याचा प्रयत्न करू नये.
  • समुद्रात किंवा तलावात कुणी बुडत असल्याचे निदर्शनास आल्यास त्वरित अग्निशमन दलाचे जवान, पोलिस किंवा जीवरक्षकांना कळवावे.
  • अफवा पसरवू नका किंवा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका.
  • भाविकांनी लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी. त्यांना पाण्यात जाऊ देऊ नये.
भरती आणि ओहोटीवेळी नागरिकांनी अशी घ्यावी काळजी

यंदा अनंत चतुर्दशी दिवशी (दिनांक २८ सप्टेंबर २०२३) समुद्रात सकाळी ११ वाजता ४.५६ मीटरची भरती, सायंकाळी ५.०८ वाजता ०.७३ मीटरची ओहोटी, रात्री ११.२४ वाजता ४.४८ मीटर उंचीची भरती असेल. यानंतर, दिनांक २९ सप्टेंबर २०२३ रोजी पहाटे ५.१५ मिनिटांनी ०.५६ मीटरची ओहोटी, सकाळी ११.३७ वाजता ४.७१ मीटरची भरती, सायंकाळी ५.४९ वाजता ०.३६ मीटरची ओहोटी असेल. या भरती तसेच ओहोटीदरम्यान विसर्जनासाठी चौपाट्यांवर येणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

(हेही वाचा – Goregaon-Mulund Link Road : गोरेगाव-मुलुंड लिंक रोड पूर्ण झाल्यानंतर पुढील देखभालीसाठी होणार ३१५ कोटी रुपयांचा खर्च)

मत्स्यदंशापासून बचाव करा, वेळीच प्रथमोपचार घ्या

ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये मुंबई येथील समुद्राच्या किनारपट्टीवर ‘ब्लू बटन जेलीफीश’, ‘स्टिंग रे’ प्रजातीच्या माशांचा वावर अधिक दिसून येतो. या पार्श्वभूमीवर विसर्जनादरम्यान मत्स्यदंश होऊ नये, याची काळजी नागरिकांनी घेण्याचे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मत्स्यदंशाची घटना घडल्यास चौपाटी परिसरात वैद्यकीय कक्ष सज्ज ठेवण्यात आला आहे. तसेच एक १०८ रूग्णवाहिका तैनात करण्यात आली आहे.

१) ‘स्टींग रे’ने दंश केलेल्या जागी आग किंवा चटका लागल्याचा अनुभव येतो. जेलीफिशच्या दंशामुळे फार मोठ्या प्रमाणात खाज सुटते.

२) ‘स्टींग रे’ किंवा ‘जेली फिश’चा दंश झाल्यास नागरिकांनी घाबरून जाऊ नये. तात्काळ नजीकच्या प्रथमोपचार केंद्रात किंवा रूग्णालयात जाऊन प्रथमोपचार घ्यावेत.

३) जेलीफिशचा दंश झालेले स्पर्शक काळजीपूर्वक काढून टाकावे.

४) जखम चोळली किंवा चोळून चिघळली जाणार नाही, याची खबरदारी घ्यावी.

५) मत्स्यदंश झालेली जखम स्वच्छ पाण्याने धुवून काढावी.

६) जखम झालेल्या जागी बर्फ लावावा.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.