गणेश गुसिंगे या तलाठी भरती परीक्षेचा पेपर फोडणाऱ्या आरोपीला या परीक्षेमध्ये १३८ गुण मिळाली असल्याची माहिती मिळाली आहे. तलाठी पेपर भरती परीक्षेचा (Talathi Exam) पेपर फोडल्याप्रकरणी गणेश गुसिंगे हे नाव चर्चेत आलं होतं.
नाशिकला तलाठी परीक्षेत पेपर फोडल्याप्रकरणी गुसिंगे याला ताब्यात घेण्यात आले होते. गुसिंगे याला परीक्षा केंद्राबाहेर पकडण्यात आलं होतं. याप्रकरणी मुख्य संशयित गणेश श्यामसिंग गुसिंगे (२८, रा. वैजापूर, जि. संभाजीनगर) यास टॅब, मोबाईल, वॉकीटॉकी व अन्य उपकरणांसह अटक करण्यात आली. त्याचा साथीदार सचिन नायमाने व परीक्ष केंद्रातील संशयित युवती संगीता गुसिंगे हे दोघे गर्दीचा फायदा घेऊन पसार झाले.
(हेही वाचा : Pune Vidyapeeth : मराठी भाषा टिकवण्यासाठी विद्यापीठामध्ये मराठी अनिवार्य करा)
स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने ट्विट करुन यासंदर्भातील माहिती दिली आहे. गुसिंगेला १३८ गुण मिळाले असल्याने त्याची निवड होण्याचीही शक्यता आहे. गुसिंगे हा पिंपरी चिंचवड पोलिस भरती प्रकरणात फरार होता. त्यामुळे पेपर फोडणारा गुसिंगे यावर काय कारवाई होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.तलाठी पदासाठीची परीक्षा गुरुवारी ( १७ऑगस्ट ) झाली. नाशिकमधील म्हसरूळ केंद्रात हायटेक कॉपी प्रकरण उघडकीस आले.याप्रकरणी आयुक्तांनी तपासासाठी विशेष पथकाची नेमणूक केली आहे. या पथकाने संशयित गणेश गुसिंगे याच्या मूळ गावी वैजापूरला जाऊन घरझडती घेतली. परंतु त्यात पोलिसांच्या हाती काय लागले, याची माहिती मिळू शकलेली नाही.संशयित गणेश गुसिंगे याच्याविरोधात यापूर्वीच म्हाडाचा पेपर व पिंपरी चिंचवड येथील पोलिस भरतीचा पेपर फोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. मात्र दोन वर्षांपासून तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community