सध्या राज्यात तलाठी भरतीसाठीच्या (Talathi Exam) परीक्षा सुरु आहेत. मात्र या परीक्षेमधील गोंधळ दिवसेंदिवस वाढतच आहे. अशातच पुन्हा एकदा तलाठी परीक्षेत हायटेक कॉपीचा प्रकार उघडकीस आला आहे.
अमरावती येथे ४ सप्टेंबर रोजी झालेल्या तलाठी भरती परीक्षेच्या (Talathi Exam) तिसऱ्या सत्रामध्ये हायटेक कॉपी करणाऱ्या एकाला पोलीसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याच्याकडून मोबाईल, डिव्हाईस, ईअर फोन जप्त करण्यात आले आहे. परीक्षा केंद्रात प्रवेश करण्याआधी प्रत्येक उमेदवारांची तपासणी केली जाते. या तपासणी दरम्यान हा प्रकार उघडकीस आला.
(हेही वाचा – Pune Crime : पोलीसाने केला महिला पोलीस शिपायावर बलात्कार, मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल)
बीड जिल्ह्यातील एका उमेदवाराकडे (Talathi Exam) ही हायटेक सामुग्री सापडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. अमरावतीच्या ड्रीमलॅन्ड मार्केट या परीक्षा केंद्रात हा प्रकार घडला असून नांदगाव पेठ पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दीपक चवरे (बीड) असं अटक करण्यात आलेल्या उमेदवाराचं नाव असून त्याची सध्या चौकशी सुरू आहे.
या आधीही नाशिकमध्ये तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये (Talathi Exam) पेपर फुटीची घटना घडली असून त्या प्रकरणी गणेश गुसिंगे या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. आरोपी गणेश गुसिंगे याचा पिंपरी चिंचवड येथील पोलिस भरती प्रक्रिया आणि म्हाडाच्या परीक्षेचा पेपर फोडल्यामागेही हात होता.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community