Talathi Paper Leak : नाशिकमध्ये वॉकीटॉकीद्वारे फोडला तलाठी परीक्षेचा पेपर; एकाला अटक

राज्यातील इतर शहरातही हे रॅकेट पसरलेले आहे का, याचा सखोल तपास सुरू

200
Talathi Paper Leak : नाशिकमध्ये वॉकीटॉकीद्वारे फोडला तलाठी परीक्षेचा पेपर; एकाला अटक

संपूर्ण राज्यामध्ये महत्त्वपूर्ण असलेल्या तलाठी भरतीचा पेपर नाशिकमध्ये फुटला (Talathi Paper Leak) असून याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

तलाठी भरती परिक्षेच्या (Talathi Paper Leak) पहिल्याच दिवशी नाशिकमध्ये पेपर फुटल्याची घटना घडली. म्हसरुळच्या परिक्षा केंद्राबाहेर ताब्यात घेतलेल्या संशयिताकडे पोलिसांना टॅब, दोन मोबाईल, वॉकीटॉकी, हेडफोन्स सापडले. अधिकची तपासणी केली असता मोबाईलमध्ये पेपरमधील प्रश्नांचे फोटो आढळून आले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

(हेही वाचा – Swachha Bharat : ‘स्वच्छ भारत अभियाना’पूर्वी ‘या’ व्यक्तीने देशाला दाखवला होता स्वच्छतेचा मार्ग)

नेमका प्रकार काय?

तलाठी परीक्षेत (Talathi Paper Leak) परीक्षार्थीला वॉकीटॉकीद्वारे बाहेरून उत्तरे पुरवणाऱ्या संशयिताला नाशिकमधील म्हसरूळ येथील केंद्राबाहेर अटक करण्यात आली. गणेश गोसिंगे असे या संशयिताचे नाव असून तो संभाजीनगर येथील आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताकडून वॉकीटॉकी, दोन मोबाइल, एक टॅब आणि कानातील सूक्ष्म श्रवणयंत्र जप्त करण्यात आले. एका परीक्षार्थीने त्याच्या छुप्या कॅमेऱ्यातून प्रश्नपत्रिका ब्ल्यूटूथद्वारे हॉलबाहेर पाठवली. बाहेरील संशयिताने अतिसूक्ष्म श्रवणयंत्राच्या मदतीने वॉकीटॉकीद्वारे उमेदवारांना उत्तरे सांगितली.

दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल – उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ

दरम्यान, प्रशासनाने या प्रकाराची (Talathi Paper Leak) गांभीर्याने दखल घेतली आहे. गैरप्रकाराची चौकशी पोलिसांकडून सुरू असून दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी सांगितले. संशयिताने किती उमेदवारांना काॅपी पुरवली, राज्यातील इतर शहरातही हे रॅकेट पसरलेले आहे काय, याचा सखोल तपास सुरू असल्याचे पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी सांगितले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.