Talathi Recruitment Exam : तलाठी भरती परीक्षेतील गुणांचा गोंधळ नेमका काय ? महसूल विभागाचे स्पष्टीकरण

Talathi Recruitment Exam : कोणताही गैरप्रकार झालेला नसून 'हा प्रकार केवळ गैरसमजुतीतून, अज्ञानातून घडला आहे', असे महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या वतीने कळवण्यात आले आहे.

334
Talathi Recruitment Exam : तलाठी भरती परीक्षेतील गुणांचा गोंधळ नेमका काय ? महसूल विभागाचे स्पष्टीकरण
Talathi Recruitment Exam : तलाठी भरती परीक्षेतील गुणांचा गोंधळ नेमका काय ? महसूल विभागाचे स्पष्टीकरण

तलाठी भरती प्रक्रियेमध्ये (Talathi Recruitment Exam) पुन्हा एकदा गोंधळ झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. परीक्षा २०० गुणांची असतांना ४८ उमेदवारांना 200 पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा या परीक्षेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. याविषयी महसूल विभागाने (revenue department) खुलासा केला आहे.

कोणताही गैरप्रकार झालेला नसून ‘हा प्रकार केवळ गैरसमजुतीतून, अज्ञानातून घडला आहे’, असे महाराष्ट्र शासनाच्या (Government of Maharashtra) महसूल विभागाच्या वतीने कळवण्यात आले आहे. ‘परीक्षा निकाल रद्द करू नये’, अशी मागणी पास झालेल्या विद्यार्थ्यांनी केली आहे.

(हेही वाचा – Jay Jay Swami Samarth : कलर्स मराठी वाहिनीकडून स्वामी समर्थांना धर्मनिरपेक्ष दाखवण्याचा प्रयत्न; दर्शकांमध्ये संताप)

सामान्यीकरण प्रक्रियेमुळे गोंधळ

वर्ष २०२३ मध्ये तलाठी भरती परीक्षा 3 भागांत आणि 57 सत्रांमध्ये घेण्यात आली आहे. महाराष्ट्र भरातून तलाठी पदासाठी 10 लाख 41 हजार 713 परीक्षार्थीनी अर्ज दाखल केले. 8 लाख 64 हजार 960 उमेदवारांनी परीक्षा दिली. पण निकाल जाहीर झाल्यानंतर पुन्हा वादाला तोंड फुटले आहे.

या वेळी तलाठी भरती प्रक्रियेचे कंत्राट तलाठी परीक्षा टीसीएस या कंपनीने घेतली. टीसीएसने 57 प्रश्नपत्रिकांची काठिण्य पातळी विचारात घेऊन उमेदवारांनी प्रश्नांची उत्तरे देऊन मिळवलेल्या उत्तरांच्या गुणांवर गुण सामान्यीकरण प्रक्रिया केली आहे. हीच प्रक्रिया कोणाला कळली नाही.

(हेही वाचा – Prakash Ambedkar : विधानसभा अध्यक्षांना सामान्य व्यक्तीप्रमाणे वागणूक देण्याचा सुप्रीम कोर्टाचा मार्ग असंविधानिक – आंबेडकर)

सामान्यीकरण प्रक्रियेदरम्यान गुणांमध्ये वाढ किंवा घट

सामान्यीकरण केलेल्या गुणानुसार उमेदवारांना मिळालेले सामान्यीकृत गुण शासकीय वेबसाईटवर तलाठी भरती पोर्टल (Talathi Recruitment Portal) टॅबवर प्रसिद्ध करण्यात आले. सामान्यीकरण प्रक्रियेदरम्यान काठिण्य पातळीनुसार उमेदवारांना मिळालेल्या गुणांमध्ये वाढ किंवा घट होते. त्यामुळे काही उमेदवारांचे सामान्यीकृत गुण हे एकूण गुणांपेक्षा जास्त झालेत. तलाठी भरती परीक्षेमध्ये एकूण 48 उमेदवारांना 200 पेक्षा जास्त सामान्यीकृत गुण मिळाले आहेत.

‘परीक्षेच्या निकालानंतर संपूर्ण परीक्षाच रद्द करा’ अशी मागणी होत आहे. त्यामुळे मोठ्या अभ्यासानंतर परीक्षा पास झालेले उमेदवार निराश झाले आहेत.

यापूर्वीही पेपरफुटीमुळे तलाठी भरती प्रक्रियेची चर्चा चालू होती. (Talathi Recruitment Exam)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.