मुंबई लोकलच्या ३२६ डब्यांमध्ये महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी Talk Back यंत्रणा

मुंबई लोकल ट्रेनने दररोज हजारो महिला प्रवास करतात. रेल्वेतून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर अनेकदा प्रश्न उपस्थित होतात. याच पार्श्वभूमीवर आता महिलांच्या डब्यात टॉक बॅत यंत्रणा ( Talk Back System) बसविण्याचा निर्णय मध्य आणि पश्चिम रेल्वेने घेतला होता. या यंत्रणेद्वारे महिला आपत्कालीन परिस्थितीमध्ये मोटरमन किंवा गार्डशी संपर्क साधू शकतात. आतापर्यंत एकूण ५१ लोकमधील ३२७ डब्यांमध्ये ही टॉक बॅक यंत्रणा बसवण्यात आली आहे.

( हेही वाचा : ‘बेस्ट’च्या ताफ्यात दाखल होणार पहिली इलेक्ट्रिक AC डबल डेकर बस!)

टॉक बॅक सुरक्षा यंत्रणा

सकाळी आणि संध्याकाळी गर्दीचा कालावधी वगळला तर पहाटे आणि रात्रीच्यावेळी महिलांसाठी राखीव डब्यांमध्ये चोरीसाठी महिला प्रवाशांवर हल्ला करणे, मारहाण करणे इत्यादी गुन्हे घडतात, अशा परिस्थितीत धावत्या लोकलमधून महिला प्रवाशांना मोटरमन, गार्डकडे मदत मागता येत नव्हती. यामुळेच महिला डब्यांमध्ये टॉक बॅक सुरक्षा यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

मोटरमन आणि गार्डशी संपर्क साधता येणार

मध्य रेल्वेच्या ताफ्यात आता १५६ लोकल आहेत यापैकी ४० लोकमधील २४० महिला डब्यांमध्ये टॉक बॅक यंत्रणा बसवण्यात आली आहे. तर पश्चिम रेल्वेतील ८७ डब्यांमध्ये ही यंत्रणा उपलब्ध करण्यात आली आहे. प्रत्येक लोकलमध्ये प्रथम श्रेणीच्या डब्यांसह महिलांचे पाच डबे असतात, यात १५ टॉक बॅक यंत्रणा उपलब्ध करण्यात येणार आहे. परंतु अद्याप या योजनेला गती मिळालेली नाही. जवळपास दोन वर्षांत टॉक बॅक यंत्रणा बसवण्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.

टॉक बॅक या यंत्रणेद्वारे गाडीतील महिला प्रवाशांना आपत्कालीन परिस्थितीत मोटरमन आणि गार्डशी संपर्क साधता येणार आहे. या यंत्रणेचे बटण दाबल्यानंतर डब्यातील छोट्या स्पिकरद्वारे लोकलच्या मोटरमन, गार्डशी संवाद साधला जातो. तसेच कोणत्या डब्यातील बटण दाबले जाईल याची माहितीही गार्डला मिळते यामुळे आपत्कालीन परिस्थितीत मदत करणे सोयीचे होणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here