Tamhini Ghat: भुशी डॅमनंतर आता ताम्हिणी घाटात दुर्घटना; धबधब्यात उडी मारणाऱ्या तरुणाने गमावला जीव

1026
Tamhini Ghat: भुशी डॅमनंतर आता ताम्हिणी घाटात दुर्घटना; धबधब्यात उडी मारणाऱ्या तरुणाने गमावला जीव
Tamhini Ghat: भुशी डॅमनंतर आता ताम्हिणी घाटात दुर्घटना; धबधब्यात उडी मारणाऱ्या तरुणाने गमावला जीव

पावसाळा सुरू झाल्यवर पर्यटकांना वेध लागतात ते वर्षा सहलीचे, मात्र पर्यटनाच्या ठिकाणी नियमांचे पालन न केल्यास जीवितहानी होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर होते. प्रथम अशीच एक घटना रविवारी लोणावळा (Lonavala) जवळील भुशी डॅम (Bhushi Dam) येथे घडली आणि या घटनेमध्ये एकाच कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू झाला. तर पुणे जिल्ह्यातील ताम्हिणी घाटामधील (Tamhini Ghat) धबधब्यात एक तरुण वाहून गेल्याची दुसरी घटना घडली. संबंधित तरुण आपल्या जिममधील ३२ जणांच्या ग्रुपसोबत ताम्हिणी घाटात फिरण्यासाठी आले होते. स्वप्नील धावडे (Swapnil Dhavde) असं या मयत व्यक्तीचं नाव आहे. समाज माध्यमातून या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

(हेही वाचा – Rahul Dravid : ‘मी पुढील आठवड्यापासून बेरोजगार आहे,’ – राहुल द्रविड)

मिळालेल्या माहितीनुसार, मयत स्वप्नील धावडे हे आपल्या जिममधील ३२ जणांच्या ग्रुपसोबत ताम्हिणी घाटात फिरण्यासाठी आले होते. शनिवारी त्यांचा ग्रुप ताम्हिणी घाटातील प्लस व्हॅली (Tamhini Ghat Plus Valley) येथे गेला होता. स्वप्नील हे पिंपरी-चिंचवडमधील भोसरी येथील रहिवाशी आहेत. ताम्हिणी घाटात गेलेल्या स्वप्नील धावडे यांनी पाण्यात उडी मारल्यानंतर ते पाण्याच्या जोरदार प्रवाहात बेपत्ता झाले. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये धावडे हे उंचावरून धबधब्यात उडी मारताना दिसत आहेत. स्वप्नील धावडे हे बॉक्सिंगमध्ये राष्ट्रीय खेळाडू (National Athlete in Boxing) राहिले असून त्याच आधारे ते भारतीय सैन्यात सामील झाले होते. १८ वर्षांच्या सेवेनंतर ते मागील वर्षी निवृत्त झाले. त्यांची पत्नी पिंपरी चिंचवड पोलिस दलात कार्यरत आहे.

(हेही वाचा – विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपाकडून Pankaja Munde सह ‘या’ पाच जणांना संधी)

दोन दिवसांनी  मृतदेह सापडला  

सतत पडणाऱ्या पावसामुळे ताम्हिणी घाटातील प्लस व्हॅलीच्या कुंडांमध्ये पाण्याचा प्रवाह वाढला आहे. पौड पोलिस, ताम्हिणी वनविभाग, मुळशी आपत्ती व्यवस्थापन समिती, शिवदुर्ग टीम लोणावळा यांच्या मार्फत प्लस व्हॅलीच्या वरील बाजूच्या पाण्याच्या दोन्ही कुंडांमध्ये आणि आसपासच्या परिसरात स्वप्नील यांचा शोध घेतला. मात्र, या टीमला कोठेही स्वप्नील आढळले नाहीत. दरम्यान, रविवारी सकाळी आठ वाजल्यापासून सायंकाळी सहापर्यंत या परिसरात शोधकार्य सुरू होते. सोमवारी सकाळी पुन्हा या ठिकाणी शोधकार्य सुरू असताना, सकाळी मृतदेह रायगड जिल्ह्यातील माणगांव येथे आढळून आला. 

हेही पाहा –

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.